जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'सावरकरांनी लिहिलेल्या पुस्तकातच..' मुलीच्या वादग्रस्त वक्तव्यावर वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण

'सावरकरांनी लिहिलेल्या पुस्तकातच..' मुलीच्या वादग्रस्त वक्तव्यावर वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण

मुलीच्या वादग्रस्त वक्तव्यावर वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण

मुलीच्या वादग्रस्त वक्तव्यावर वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण

काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावर वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 15 एप्रिल : राहुल गांधी यांच्या वक्तव्यापासून सुरू झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचा वाद थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाने यावरुन काँग्रेसला इशारा दिला होता. काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवानी वडेट्टीवार यांच्या कथित भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून माफी मागण्याची मागणी केली गेली. मात्र, शिवानी वडेट्टीवार यांनी त्यांचं वक्तव्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातीलच असल्याचा दावा करत माफी मागण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर वडील विजय वडेट्टीवार यांनी यावर आता स्पष्टीकरण दिलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

मुलगी शिवानीच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार काय म्हणाले? नागपूरमध्ये बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. फुले, शाहू महाराज हे आमचे आदर्श आहेत. नाना पटोलेंनी समर्थन केलं असेल तर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. कोणी कुणाला मानावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. कुणाचा अपमान करण्याचा उद्देश नाही. भाजपच्या लोकांनी सगळं वाचावं. सावरकर यात्रा निघाली तेव्हा अनेकांना त्यांच्याबद्दल काही माहिती नव्हतं. काँग्रेसच्या काळात वि दा सावरकर असा धडा असायचा. वाचा - बहिण भावाची वाढती जवळीक अन् पंकजांचं धनंजय मुंडेंना मोठं गिफ्ट महाविकास आघाडी संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीकाटिप्पण्णी भाजपामुळे सुरू झाली. 2014 पूर्वी ही सावरकर स्वातंत्र्यवीर पाठ्यपुस्तकात होतेच. काँग्रेसचं सरकार असताना हे कधी बदललं नाही. 2014 नंतर भाजप जाणीवपूर्वक नेहरू, गांधीना कमी लेखण्यासाठी सावरकारांना मोठ करण्याचा प्रयत्न करायला लागले. त्यातून टीका टिपण्णी सुरू झाली. शिवानी विधी शाखेची पदवीघर आहे. जे वाचलंय ते रेफरन्स असल्याशिवाय ती बोलणार नाही. तणाव निर्माण होण्यासारखी स्थिती नाही. तिने केलेल्या वक्तव्याचा खुलासा शिवानी करेल. हा फार गंभीर विषय नाही, असं स्पष्टीकरण वडेट्टीवार यांनी दिलं आहे. शिवानी वडेट्टीवार काय म्हणाल्या? बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, अशा विचारांचं सावरकरांनी समर्थन केलं, असा दावा शिवानी यांनी केलाय. हे लोक फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाहीत. तर सावरकरांवर मोर्चा काढतात. सावरकरांचे विचार होते, बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हे तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांविरोधात वापरलं पाहिजे. या विचारांचे ते समर्थन करतात. मग माझ्यासारख्या महिला भगिनींना कसं सेफ वाटेल, असा सवाल शिवानी वडेट्टीवार यांनी केलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात