मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्रात पुन्हा अलर्ट! या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा

महाराष्ट्रात पुन्हा अलर्ट! या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अलर्ट

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अलर्ट

मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, त्यातच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 13 मार्च : मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, त्यातच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूरसह विदर्भात 15 मार्च ते 18 मार्च या काळात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भाच्या सगळ्याच जिल्ह्यांना नागपूर वेधशाळेने यलो अलर्ट जारी केला आहे.

शेतकऱ्यांनी शेतीची कामं लवकर आटोपती घेत पिकांची काळजी घेण्याचं आवाहन नागपूर वेधशाळेने केलं आहे. तसंच 17 मार्चनंतरदेखील गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

होळीच्या तोंडावरच राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, ज्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक भुईसपाट झालं. उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मागच्या आठवड्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अजूनही अधिकारी बांधावर पोहोचले नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण करू नका, फडणवीसांनी सुनावलं

पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसाच्या मदतीवरून विरोधकांना सुनावलं. विरोधी पक्षनेते अजित पवार, नाना पटोले, छगन भुजबळ यांनी अवकाळी पावसाचा मुद्दा उपस्थित केला आहे. या संदर्भात शासनाने तत्काळ माहिती मागवली आहे. यामध्ये आठ जिल्ह्यांमध्ये एकूण 13 हजार सातशे 29 हेक्टर एवढं नुकसान झालं आहे. ज्यामध्ये पालघरमध्ये विक्रमगट आणि जव्हार या भागामध्ये सातशे साठ हेक्टर क्षेत्रावर आंबा आणि काजूचं नकुसान झालं आहे. नाशिकमध्ये निफाड, त्र्यबकेश्वर, नाशिक या तालुक्यांमध्ये दोन हजार सातशे 85 हेक्टरवर गहू, भाजीपाला आणि द्राक्ष आणि आंबा पिकाचं नुकसान झालं आहे. धुळ्यामध्ये साक्री, शिरपूरमध्ये तीन हजार एकशे चौरेचाळीस हेक्टवर गहू, मका ज्वारी, पपई, केळी या पिकांचं नुकसान झालं आहे. नंदूरबारमध्ये 1576 हेक्टरवर गहू, हरभारा, मका, पपई, केळी, आंबा पिकांचं नुकसान झालं आहे. जळगावमध्ये 215 हेक्टरवर गहू, ज्वारी मका केलीचं नुकसान झालं आहे, अशी माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली.

मागच्या काळात चक्रीवादळ आले होते, त्यावेळी पैसे दिले नव्हते, त्यामुळे राजकीय बोलू देऊ नका. यावर कोणतेही राजकारण करू नका. आतापर्यंत आलेली सगळी माहिती दिली आहे. या नुकसानीबद्दल तत्काळ मदत दिली जातील. एक गोष्ट मदत आहे, विरोधी पक्षांना फक्त शेतकऱ्यांच्या मुद्यावर राजकारण करायचे आहे. हे मगरीचे अश्रू आहे. कोकणावर संकट आले तेव्हा आम्ही मदत केली होती. कांदा उत्पादकांना मदत दिली जाणार आहे. काल अवकाळी पाऊस आला, याचे तत्काळ पंचनामे करण्यात आले आहे. पंचनामे केल्याशिवाय मदत दिली जात नाही, हे विरोधकांना माहिती आहे. फक्त विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. कांदा उत्पादकांना सरकार मदत करेल. अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे. विरोधकांनी सभात्याग केले आहे, ते केवळ राजकारण आहे, अशी टीका फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

First published: