जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उन्हाळ्यात जवळ बाळगावा कांदा! पाहा काय आहे आयुर्वेदातील महत्त्व, Video

उन्हाळ्यात जवळ बाळगावा कांदा! पाहा काय आहे आयुर्वेदातील महत्त्व, Video

उन्हाळ्यात जवळ बाळगावा कांदा! पाहा काय आहे आयुर्वेदातील महत्त्व, Video

उन्हाळ्यात जवळ बाळगावा कांदा! पाहा काय आहे आयुर्वेदातील महत्त्व, Video

Summer Tips: उन्हाळ्यात जवळ कांदा बाळगावा. मात्र, यामागचं आयुर्वेदिक कारण नक्की पाहा.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 3 मे: सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा बसायला सुरुवात झाली असून बहुतांश जिल्हातील उष्णतेचा पारा वाढतो आहे. या उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय योजले जातात. अशात उन्ह लागू नये म्हणून खिशात कांदा बाळगण्याचा सल्ला देखील अनेक लोक देत असतात. मात्र उन्हाळ्यात जवळ कांदा बाळगण्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे ? कांदा जवळ बाळगल्यास उन्ह लागत नाही या गोष्टीत कितपत तथ्य आहे ? आयुर्वेदात कांदाचे महत्त्व काय आहे ? अशा प्रश्नांचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत. उन्हापासून बचावासाठी विविध साधनांचा वापर सध्या वाढत्या उन्हामुळे होणाऱ्या असह्य वेदना लक्ष्यात घेता नाना तऱ्हाचे उपाय योजले जातात, उन्हापासून बचाव व्हावा यासाठी सुती कपडे, टोपी, रुमाल, सन कोट इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. अशातच उन्हात बाहेर पडताना जवळ कांदा बाळगताना देखील अनेक लोक दिसतात. मात्र या मागील शास्त्रशुद्ध कारण फार क्वचित कुणाला माहिती असतं. आयुर्वेद मध्ये या बाबतीत कांद्याचे महत्त्व विषद केले आहे.

News18लोकमत
News18लोकमत

उन्हाळ्यात कांदा बाळगण्याच कारण उन्हाळयात आपण बघत असतो की ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असतं असे फळं आपल्याला बाजारात या दिवसात जास्त प्रमाणात दिसतात. उदा. टरबूज, खरबूज, द्राक्षे, आंबा, ऊस इत्यादी मध्ये पाण्याचा अंश जास्त असतो. तसेच कांद्यामध्ये देखील पाण्याचा अंश जास्त प्रमाणात आढळून येतो. कांद्याचे गुणधर्म आपण बघितले तर पाणी धरून ठेवणं हा त्याचा महत्त्वाचा गुण आहे. समजा आपण बाहेर गेले आणि उन्ह लागले असता त्वरित उपयोगात आणलं जाऊ शकणारं औषीध द्रव्य म्हणून कांद्याचा वापर करता येऊ शकतो. कांदा सहजा सहजी उपलब्ध होऊ शकतो, सहज हातांनी फोडला आणि लगेच वापरला जाऊ शकतो. तसाच तो जवळ देखील बाळगता येतो. उन्ह लागल्यास कांद्याचा वापर उन्ह लागल्यास कांदा फोडून जर हाताला घासल्यास त्याच्या गुणांचा आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो. आपण बघतो या उन्हाळ्यात, कडक उन्ह असण्याच्या दिवसात उष्णतेमुळे बऱ्याच लोकांना नाक फुटण्याचा त्रास असतो. अशावेळी कांदा फोडून त्याचे दोन थेंब रस नाकात टाकल्यास किंवा त्याचा वास घेतल्यास रक्तस्त्राव त्वरित थांबवता येऊ शकतो. कांद्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी6 आदी जीवनावश्यक घटक ही असतात. Nagpur News: वाढत्या उष्माघातावर देशातील पहिला ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’, पाहा Video कांद्यात रोगप्रतिकारक क्षमता कांद्यात अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टी सांगितली आहे. उन्हाच्या दिवसात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने शरीर निर्जलीकरण होत असतं. या दरम्यान रोगप्रतिकार क्षमता कमी असल्यास इन्फेक्शन होण्याचे प्रमाण जास्त असते. अशावेळी कांद्यातील या गुणधर्माची मदत होते. कांदा फोडून हातापायाला लावला गेला अथवा त्याचा रस लावला गेला तरी रोगाला प्रतिरोध करण्याची शरीराची क्षमता यामुळे वाढते. आयुर्वेदामध्ये कांद्याचे काय आहे महत्त्व ? उन्हाळ्याच्या दिवसात कांदा सोबत बाळगण्याचा सल्ला अनेकजण देत असतात. मात्र केवळ सोबत कांदा बाळगल्याने त्याचा परिणाम होईल असं होत नसतं. एक प्राथमिक उपाय म्हणून कांदा सोबत बाळगणे आवश्यक आहे. आयुर्वेदामध्ये कांद्याबद्दल मत मतांतरं आहेत. काहींच्या मते कांदा थंड म्हटला आहे तर काहींनी अनुष्ण म्हणजेच फार उष्ण ही नाही आणि फार थंडही नाही असं म्हटलं आहे. आयुर्वेदामध्ये याचा अजून एक उपयोग सांगितला आहे तो म्हणजे कांदा हा अग्निवर्धक आहे. हिवाळ्यात भूक अधिक लागते. त्यामानाने उन्हाळ्यात भूक कमी लागत असते. कांद्याच्या भूक वाढवण्याच्या गुणामुळे उष्ण ऋतूत भूक वाढण्यास हातभार लागण्यास मदत होते. कांदा दर नियमित खाण्यात आला तर त्याने पचनक्रिया देखील सुरळीत राहते, अशी माहिती आयुर्वेदिक चिकित्सक स्वानंद जोशी यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात