जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ऐकावं ते नवलच! समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी महामृत्युंजय यंत्राची स्थापना

ऐकावं ते नवलच! समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी महामृत्युंजय यंत्राची स्थापना

समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय यंत्राची स्थापना

समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय यंत्राची स्थापना

सर्वाधिक अपघात हे बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गावर झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या महारार्गावर अपघाताच्या ठिकाणी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

राहुल खंडारे, बुलडाणा, 24 जुलै : समृद्धी महामार्गावर सातत्त्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. हा माहामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत 950 हून अधिक छोटे मोठे अपघात झाले आहेत. परंतु सर्वाधिक अपघात हे बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गावर झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या महारार्गावर अपघाताच्या ठिकाणी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसला झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता.यानंतर या मार्गावरील अपघात टाळण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. जास्त अपघात टायर फुटल्याने होत असल्याने परिवहन विभागाच्या वतीने शिर्डी आणि नागपूर अशा दोन ठिकाणी टायर तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. एसटीची वाट पाहत होते प्रवासी, भरधाव डंपर समोरून आला अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO बुलढाणा परिसरातच अनेक अपघात झाले आहेत, त्यामुळे याठिकाणी शासनाचे उपाय तर आहेतच शिवाय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करून सव्वा कोटी महामृत्युंजय मंत्राचाही जप करण्यात आलाय. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास मार्ग दिंडोरी प्रणित मार्गाच्या वतीने बस अपघातात मृत्यू झालेल्या 25 जणांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी आणि भविष्यात या महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करण्यात आली आहे. जवळपास दीडशे महिला आणि पुरुषांनी मिळून या महामृत्युंजय यंत्राची स्थापना केली. तसेच याठिकाणी सव्वा कोटी महामृत्युंजय मंत्राचा जपही करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: nagpur
  • First Published :
जाहिरात
जाहिरात