मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तोचि दिवाळी-दसरा; हेमलकशात लेझीमचा आवाज दुमदुमला, प्रकाश आमटे परतताच मुलांनी असं केलं स्वागत

तोचि दिवाळी-दसरा; हेमलकशात लेझीमचा आवाज दुमदुमला, प्रकाश आमटे परतताच मुलांनी असं केलं स्वागत

प्रकाश भाऊचं सर्व मुलांनी मिळून अनोख्या पद्धतीने स्वागत केलं.

प्रकाश भाऊचं सर्व मुलांनी मिळून अनोख्या पद्धतीने स्वागत केलं.

प्रकाश भाऊचं सर्व मुलांनी मिळून अनोख्या पद्धतीने स्वागत केलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

गडचिरोली, 6 सप्टेंबर : ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांना यांना कर्करोगाचे निदान झाल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते तीन महिन्यानंतर कर्करोगावर मात करुन डॉक्टर प्रकाश आमटे हेमलकसात पोहोचले त्यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात हेमलकसा येथे जेष्ट समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे गेली अनेक वर्ष सामाजिक कार्य करीत आहेत.

लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींची सेवा करणाऱ्या डॉक्टर प्रकाश आमटे यांना तीन महिन्यापूर्वी कर्करोगाचा निदान झाले होते. प्रकाश आमटे पुण्यात असताना त्याची प्रकृती बिघडली होती. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांना कर्करोगाचे निदान झाल्याची बातमी पसरल्यानंतर सगळीकडे चिंता व्यक्त करण्यात आली होती. सहा जूनला एका खाजगी कार्यक्रमासाठी डॉक्टर प्रकाश आमटे मंदाकिनी आमटेंसोबत पुण्याला गेले होते तिथे त्यांची प्रकृती बिघडली, त्याची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना कर्करोग असल्याचे निदान झाले होते.

कॅन्सरच्या निदानानंतर प्रकाश आमटेंची प्रकृती कशी आहे? मुलाने दिली आनंदाची बातमी!

त्यानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टर प्रकाश आमटे यांच्यावर उपचार सुरू झाले. डॉक्टर प्रकाश आमटे यांची प्रकृती कधी बरी होत होती तर कधी बिघडत होती. मात्र त्यांच्या प्रकृती संदर्भात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सुद्धा लोकांकडून प्रकृती बरी व्हावी यासाठी शुभेच्छा देण्यात येत होत्या. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्यावर पुण्यात उपचार सुरू असताना त्यांचे सगळे आमटे कुटुंब त्यांच्यासोबत होते. या आजाराच्या विरोधात डॉक्टर प्रकाश आमटे यांनी अत्यंत खंबीरपणे लढा दिला आणि कर्करोगावर मात केली.

त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्यानंतर पुण्याहून ते थेट नागपूरला पोहोचले होते. नागपूरहून आज डॉक्टर प्रकाश आमटे थेट हेमलकशाला पोहोचले. हेमलकसाचा लोक बिरादरी प्रकल्पात डॉक्टर प्रकाश आमटे यांचे आगमन होताच, तेथील कार्यकर्ते नागरिक आणि विद्यार्थी यांनी जल्लोषाल डॉक्टर प्रकाश आमटे यांचे स्वागत केले. तीन महिन्यानंतर गंभीर आजाराला तोंड देऊन यशस्वीपणे ते हेमलकसात दाखल झाल्याने नागरिकांनी यावेळी आनंद व्यक्त केला आहे.

डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या आगमन झाल्यानंतर शाळेतील तब्बल 650 विद्यार्थ्यांनी जल्लोष डॉक्टर प्रकाश आमटे यांचे स्वागत केले. यावेळी डाॅ. मंदाकिनी आमटे, डाॅ. दिगंत, अनिकेत, डाॅ. अनघा, समीक्षा आमटेसह तेथील शिक्षक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

First published:

Tags: Gadchiroli, Prakash amte