Home /News /maharashtra /

'नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्यामुळे अमरावतीत 10 जणांना धमकी'; भाजप नेते अनिल बोंडेंचा मोठा आरोप

'नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्यामुळे अमरावतीत 10 जणांना धमकी'; भाजप नेते अनिल बोंडेंचा मोठा आरोप

या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी शेख इरफान शेख रहिम यांची रहेबर नावाची सामाजिक संघटना आहे. आरोपी शेख इरफान हा रुग्णसेवेचं काम करतो.

    अमरावती, 3 जुलै : अमरावतीत (Amravati Crime News) नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल केल्यामुळे उमेश कोल्हे यांची (Umesh Kolhe Murder) हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर केवळ राज्यातच नाही तर देशभरात खळबळ उडाली आहे. उदयपूरमधून अशीच एक घटना समोर आली होती. अमरावतीतील या घटनेनंतर शहरातील 10 लोकांना नुपूर शर्मांबद्दल पोस्ट टाकल्याने जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. शहरातील डॉ. गोपाल राठी यांनीही यासंदर्भात पोस्ट टाकली होती. त्यानंतर डॉ. राठी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली. माझ्यामुळे कोणत्या धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. यापुढे अशी चूक होणार नाही असंही डॉक्टर राठी यांनी आपल्या माफीनाम्यामध्ये म्हटलं. ज्यांना धमक्या आल्यात त्यांची अमरावती पोलिसांनी चौकशी केली नाही असा आरोपही अनिल बोंडे यांनी केला. मात्र अमरावतीत उमेश कोल्हे यांचं प्रकरण देशभरात गाजत असताना अमरावती पोलीस दिरंगाई का करीत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. मास्टरमाईंडची सामाजिक संघटना अमरावतीचे (Amravati News) पशुवैद्यकीय औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांची नुपूर शर्मा (Nupur Sharma Case) यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने त्यांची हत्या करण्यात आली. यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी शेख इरफान शेख रहिम यांची रहेबर नावाची सामाजिक संघटना आहे. आरोपी शेख इरफान याच्याकडे रुग्णवाहिका असून तो रुग्णसेवेचं काम करतो, अशी माहिती समोर आली आहे. कोरोना काळात त्याने अनेक रुग्णांना त्याने सेवा सुद्धा दिली होती. मात्र इतके सामाजिक काम करत असतांना उमेश कोल्हे यांची हत्या त्याने का केली? त्यामागं नेमका काय उद्देश होता ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येच्या कटाची बैठकदेखील घेण्यात आली होती. 16 जून रोजी इरफानने ही मीटिंग बोलावली होती. सामाजिक संघटनेच्या आड इरफान तरुणांना गुन्हेगारीत आणण्याचे काम करीत होता का ?  याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. सध्या आरोपी इरफानला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या चार दिवसाच्या पोलीस कोठडीत तो कोणकोणत्या गोष्टींचा उलगडा करतो याकडे लक्ष लागलं आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amravati, Crime news, Gang murder

    पुढील बातम्या