Home /News /maharashtra /

Nagpur: आधी प्रेम विवाह मग मिस्ड कॉलमुळे दुसरं लग्न अन् आता सोशल मीडिया मित्रासोबत पळून गेली; पहिल्या दोन पतींची पोलिसांत धाव

Nagpur: आधी प्रेम विवाह मग मिस्ड कॉलमुळे दुसरं लग्न अन् आता सोशल मीडिया मित्रासोबत पळून गेली; पहिल्या दोन पतींची पोलिसांत धाव

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Nagpur News: नागपुरातून एक विचित्र घटना समोर आली आहे. एक महिलेने पहिल्या पतीला सोडून दुसऱ्यासोबत लग्न केलं आणि आता तर तिसऱ्यासोबतच पळून गेली.

    नागपूर, 9 जून : नागपुरातून (Nagpur) एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरातील भरोसा सेलमध्ये (Bharosa cell) एक व्यक्ती दाखल झाला आणि त्याने आपली पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला असता अशा प्रकारची आणखी एक तक्रार समोर आल्याचं समोर आलं. दुसऱ्या आणखी एका व्यक्तीने सुद्धा पत्नीला शोधून काढा म्हणत पोलिसांत अर्ज दाखल केला. (Nagpur two husbands approach cops against woman who run away with the third) नेमंक काय आहे प्रकरण? नागपुरातील एका महिलेचा विवाह त्याच परिसरात राहणाऱ्या तरुणासोबत झाला होता. काही वर्षांनंतर महिलेच्या मोबाइलवर एका तरुणाचा मिस कॉल आला आणि मग ती त्याच्या संपर्कात राहू लागली. मग हळूहळू त्यांच्यात प्रेम संबंध बनले. मग तिने पहिल्या पतीला सोडून दुसरं लग्न केलं. त्यानंतर काही दिवसांनी या महिलेची सोशल मीडियातील एका व्यक्तीसोबत ओळख झाली. वाचा : मारहाणीत बेशुद्धावस्थेत असलेल्या पत्नीला दारुड्या पतीने जिवंत जाळले, भिवंडीतील धक्कादायक घटना सोशल मीडियातील व्यक्तीसोबत ओळख झाल्यावर तिने दुसऱ्या पतीलाही सोडून दिलं. आता ही महिला तिसऱ्याच व्यक्तीसोबत राहत आहे. त्यानंतर आता पहिल्या आणि दुसऱ्या पतींनी आपल्या पत्नीला परत आणून द्या असं म्हणत पोलिसांत धाव घेतली आहे. नागपूर पोलिसांच्या महिला भरोसा सेलच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन इसमांनी आपली पत्नी बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या तक्रारी दिल्या होत्या. त्यानंतर चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. पहिल्या पतीपासून दोन मुले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने आपल्या पहिल्या पतीसोबत प्रेमविवाह केला होता. पहिल्या पतीपासून तिला दोन मुले आहेत. लग्नाच्या चार वर्षांनंतर ती दुसऱ्यासोबत पळून गेली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्यांनी मंदिरात लग्न केलं. वाचा : मुंबई लोकलमध्ये विद्यार्थीनीसोबत घडला विचित्र प्रकार; भामट्याने ओठ आणि नाक चावत केलं रक्तबंबाळ मिस्ड कॉलने प्रेमात पोलिसांनी सांगितले की, पहिलं लग्न झालेलं असताना या महिलेला एकेदिवशी अनोळखी नंबरवरुन मिस कॉल आला. त्यानंतर त्या नंबरवर तिने कॉल केला. हूळहळू या दोघांत संभाषण होऊ लागले आणि मग प्रेमसंबंध निर्माण झाले. यानंतर अचानक एकेदिवशी ही महिला आप्लया पहिल्या पतीला सोडून दुसऱ्यासोबत निघून गेली. तिचा पहिला नवरा हा गवंडी आहे तर दुसरा नवरा हा ऑप्टिक फाबर टाकण्याचे काम करतो. सोशल मीडियात तिसरा प्रियकर भरोसा सेलच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्यक्तीसोबत ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झालं. त्याननंतर आता ही महिला या व्यक्तीसोबत पळून गेली.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Marriage, Nagpur

    पुढील बातम्या