जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आई वडिलांचा वाद मुलांच्या जीवावर; नैराश्यात गेलेल्या दोन मुलांनी उचललं धक्कादायक पाऊल

आई वडिलांचा वाद मुलांच्या जीवावर; नैराश्यात गेलेल्या दोन मुलांनी उचललं धक्कादायक पाऊल

आई वडिलांचा वाद मुलांच्या जीवावर

आई वडिलांचा वाद मुलांच्या जीवावर

नागपुरात आई वडिलांच्या भांडणातून नैराश्यात गेलेल्या दोन मुलांनी आत्महत्या केली.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 18 मे : तुम्ही जर पालक असाल किंवा तुमची लहान भावंडे असतील तर ही बातमी फार महत्त्वाची आहे. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती.. ही विमल लिमये यांची कविता घराचं आयुष्यातील महत्व अधोरेखित करते. मात्र, अलीकडच्या काळात घरात लहान मोठ्या कारणांवरून पती पत्नीचे भांडण हा नित्याचा विषय झाला आहे. घरातील आई वडिलांच्या भांडणाला कंटाळून मुल टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आणत आहे. नागपुरात अजणी पोलीस स्टेशन आणि अंबाझरी पोलीस स्टेशन हद्दीत आई वडिलांच्या भांडणाने नैराश्यात गेलेल्या दोन मुलांनी आत्महत्या केली आहे. पांढराबोडी परिसरात विनय मसराम 15 वर्षीय मुलाने आई वडिलांच्या भांडणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे वर्षभर आधी त्याच्या बहिणीने आत्महत्या केली होती. त्यामुळे वर्षभरात त्या पालकांना दोन्ही मुलांना गमवण्याची वेळ आली. तर अजनी पोलीस स्टेशन हद्दीत नंदिनी गोरे या 16 वर्षीय मुलीने आई वडिलांच्या भांडणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यामुळे लहान मुलांच्या समोर आई वडिलांनी घरात वाद टाळले पाहिजे, असा सल्ला मानसिक रोग तज्ञ देतात. ज्याकडे सर्रास दुर्लक्ष लहान मुलांच्या जीवावर उठत आहे. घरातील भांडणाचा परिणाम मुलांच्या कोवळ्या मनावर होतो. नकळतपणे नकारात्मकता लहान वयात वाढीस लागते. याची परिणीती म्हणून मुलं टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे लहान मुलांसमोर घरातील भांडण पालकांनी टाळले पाहिजे. वाचा - पालकांच्या या 6 चांगल्या सवयी मुलांना बनवतात यशस्वी! वाढतो मुलांचा आत्मविश्वास पालकांनी मुलांसमोर वाद टाळावा तुमच्यात पतीपत्नीचं नातं असलं तरी मुलांसाठी आईवडिलांचं नातं असतं. अनेकदा पालक का भांडतात? हेही मुलांच्या कोवळ्या मनाला कळत नाही. मात्र, याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. अनेकदा मुलं एकलकोंडी होतात, नैराश्यात जातात. त्यात अभ्यास किंवा परीक्षेचा ताण असेल तर त्यांची अवस्था आणखी बिकट होते. अशा स्थितीत मुलांसमोर पालकांनी भांडण टाळायला हवं, असं तज्ज्ञांचा सल्ला आहे. मुलांशी नेहमी सुसंवाद ठेवायला हवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: nagpur , parents
  • First Published :
जाहिरात
जाहिरात