नागपूर, 13 फेब्रुवारी : गोवंश हत्या बंदी कायद्यान्वये जनावरांची तस्करी करण्याच्या प्रकरणात एका आरोपीवर गुन्हा दाखल होता. हा आरोपी नागपूर शहरातील एका इमारतीत लपला असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली. लागलीच पोलिसांनी एक पथक तयार करत आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी योजना आखली. योजनेप्रमाणे पोलिसांनी इमारतीवर छापा मारला. मात्र, याची कुणकूण लागल्याने आरोपीने पळून जाण्याच्या हेतून थेट तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. या घटनेनंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला असून नातेवाईकांनी पोलिसांवरच आरोप केले आहेत. काय आहे प्रकरण? पोलीस पाठलाग करीत असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या एका आरोपीचा नागपुरात मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातला देवलापार मध्ये इमरान शेख नावाच्या व्यक्तीचा ग्रामीण पोलीस शोध घेत होते. गोवंश हत्या बंदी कायद्यान्वये जनावरांची तस्करी करण्याच्या प्रकरणात इमरान शेख वरती देवलापार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. इमरान हा नागपूरच्या कपिल नगर परिसरातल्या म्हाडा क्वार्टरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावरती पोलीस रविवारी म्हाडा क्वार्टर्समध्ये पोहोचले. पण पोलीस आल्याचे दिसताच इमरान शेख यांनी तिसऱ्या मजल्यावर उडी घेतली. अशी माहिती नागपूरच्या झोन पाचचे पोलीस उपायुक्त श्रावण दत्ता यांनी दिली. या घटनेत इमरान जखमी झाला होता. त्याला नागपूरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेथे सोमवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. असेही नागपूरच्या झोन पाचचे पोलीस उपायुक्त श्रावण दत्ता यांनी सांगितले. वाचा - फोनवर बोलल्याने प्रेयसीच्या घरच्यांचा राग अनावर, प्रियकराला घरातून बोलावले आणि.. कुटुंबियांचा पोलिसांवर आरोप या प्रकरणात इमरान शेख यांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या कारवाईमुळे इमरानचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. इमरानच्या नातेवाईकांच्या आरोपाची चौकशी केली जाईल, असे नागपूर पोलिसांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
स्कॉर्पिओ गाडीच्या अपघात बालकाचा मृत्यू आयबीएम रोडवर एक भरधाव आलेली स्कार्पिओ रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्याशा घरामध्ये घुसली. स्कार्पिओ गाडीची धडक एवढी जोरदार होती की त्यामुळे भिंत कोसळली. घराच्या आत असलेला आठ वर्षाचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संपूर्ण भिंत त्याच्या अंगावर पडली होती.

)







