जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ATM मधून निघतायत पाचपट अधिक पैसे, नागपुरातील VIDEO VIRAL होताच नागरिकांची तोबागर्दी, पाहा व्हिडीओ

ATM मधून निघतायत पाचपट अधिक पैसे, नागपुरातील VIDEO VIRAL होताच नागरिकांची तोबागर्दी, पाहा व्हिडीओ

ATM मधून निघतायत पाचपट अधिक पैसे, नागपुरातील VIDEO VIRAL होताच नागरिकांची तोबागर्दी

ATM मधून निघतायत पाचपट अधिक पैसे, नागपुरातील VIDEO VIRAL होताच नागरिकांची तोबागर्दी

एटीएम मशीनमधून 500 रुपये काढण्यासाठी गेले असता चक्क 2500 रुपये मिळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 15 जून : एटीएम **(ATM)**मधून पैसे काढण्यासाठी गेल्यावर दुप्पट किंवा तिप्पट पैसे मिळाल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? आश्चर्य वाटतंय ना? पण असा प्रकार नागपुरातून (Nagpur) समोर आला आहे. तिथे एटीएममधून 500 रुपये काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला दुप्पट, तिप्पट नाही तर चक्क पाचपट पैसे मिळत असल्याचं समोर आलं आहे. एटीएममधून 500 रुपये विड्रॉ केल्यावर 2500 रुपये निघत असल्याचा व्हिडीओ सुद्धा शूट करण्यात आला असून तो व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. काय आहे नेमकं प्रकरण? नागपुरातील खापरखेडा येथील हा प्रकार असल्याची माहिती समोर आली आहे. येथील शिवा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या अॅक्सिस बॅकेच्या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

जाहिरात

शिवा कॉम्प्लेक्समधील या एटीएममध्ये एक व्यक्ती गेला आणि त्याने 500 रुपये विड्रॉ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एटीएम मशीनमधून चक्क पाचशे रुपयांच्या पाच नोटा म्हणजेच 2500 रुपये आले. हे पाहून त्या व्यक्तीला सुद्धा आश्चर्य वाटले. त्याने पुन्हा तसे करुन पाहिले आणि हा संपूर्ण प्रकार मग मोबाइलमध्ये शूट केला. त्यावेळी सुद्दा 2500 रुपयेच विड्रॉ झाले. वाचा :  3 लाखाची दारूची बाटली चोरायला गेलेल्या चोरांचीच झाली फजिती; CCTV मध्ये कैद झाली घटना पाहता पाहता हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि मग काय… नागरिकांनी या एटीएम सेंटरवर एकच गर्दी केली. त्याच दरम्यान पोलिसांनाही या घटनेबाबत माहिती मिळाली. लागलीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बँकेचे अधिकारीही घटनास्थळावर पोहोचले आणि त्यानंतर या एटीएमचं शटर बंद करण्यात आलं. बँकेच्या अधिकाऱ्यांनी एटीएम मशीन तपासली असता तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडल्याचं समोर आलं. मात्र, या तांत्रिक चुकीमुळे आतापर्यंत किती जणांना अधिक पैसे मिळाले याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात