नागपूर, 26 मार्च: नागपूर (Nagpur) एमआयडीसी परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एक 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी प्रेमसंबंधातून (Love affair) गर्भवती (minor girl become pregnant) राहिल्यानंतर, तिच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न (Child marriage) लावून दिलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल (FIR lodged) करत त्याला अटक (Accused husband arrested) केली आहे. पण ‘माझ्या पतीला सोडा, मी स्व: खुशीने त्याच्याशी लग्न केलं आहे’ अशी आर्त हाक पीडित मुलीने पोलिसांना घातली आहे. त्यामुळे काय कारवाई करायची? याबाबत पोलीसही चक्रावून गेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी नागपूर एमआयडीसी परिसरातील रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वीच तिच्या आईचं निधन झालं आहे. तर तिचे वडील हातमजूरी करतात. वडील कामावर गेल्यानंतर पीडित मुलगी एकटीच घरी राहायची. अशात शेजारी राहणाऱ्या एका 22 वर्षीय मुलासोबत तिची ओळख झाली. काही दिवसांतच त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. वडील कामावर गेल्यानंतर पीडित मुलगी एकटीच घरी राहत असल्याने हा मुलगाच तिला आधार वाटू लागला होता. हेही वाचा- सांगली हादरली! पत्नीसमोर झालेल्या अपमानाचा घेतला विचित्र बदला; जन्मदात्या वडिलांचा खेळ खल्लास या प्रेमसंबंधातून त्यांनी लैंगिक संबंध ठेवले असता, 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. ही बाब दोघांच्या कुटुंबीयांना कळाल्यानंतर त्यांनी फेब्रुवारीमध्ये दोघांचा विवाह लावून दिला. दोघंही नागपूर एमआयडीसी परिसरात भाड्याच्या खोलीत राहू लागले. पण हा प्रकार आशा वर्कर्सच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्ठांनी याबाबत चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हेही वाचा- दिवसाढवळ्या हत्येचा थरार; तरुणाने पाठलाग करत पत्नीवर केले सपासप वार, घटना कॅमेऱ्यात कैद या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पण ‘माझ्या पतीला सोडा, मी स्व: खुशीने त्याच्याशी लग्न केलं आहे. त्याची यामध्ये काहीच चूक नाही’ अशी आर्त हाक पीडित मुलीने पोलिसांना घातली आहे. माझ्या पतीचा गुन्हा काय? आमच्या लग्नाबाबत कुणालाही आक्षेप नाही. मग त्याला अटक का केली? माझ्या पतीला सोडा, अशी विनवणी ती पोलिसांना करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.