जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लिव्हइनने घेतला आणखी एकीचा जीव, पतीशी दुरावा अन् घडलं भयाण कांड!

लिव्हइनने घेतला आणखी एकीचा जीव, पतीशी दुरावा अन् घडलं भयाण कांड!

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अमित उपाध्याय आणि एका 45 वर्षीय महिलेमध्ये मागील एक वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

  • -MIN READ Amravati,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती, 21 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. लव्ह मॅरेज तसेच लिव्ह इन प्रकरणातून हत्येच्या घटना समोर येत आहे. त्यातच आता अमरावती जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अमरावती जिल्ह्यात पत्नीच्या लिव्ह इन पार्टनरचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - अमित नारायण उपाध्याय (38, रा. सातेफळ, ता. चांदुररेल्वे) असे मृताचे नाव आहे. ही धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील राजणा येथे मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी राजना येथील एका व्यक्तीसह त्याच्या दोन तरूण मुलांना अवघ्या दोन तासात अटक केली. अमित उपाध्याय आणि एका 45 वर्षीय महिलेमध्ये मागील एक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, ही महिला मागील एक वर्षांपासून अमितसोबत राहत असल्याने तिच्या पतीचा तिच्यावर राग होता. त्यामुळे त्याने आपल्या मुलासोबत मिळून अमितचा खून केला, अशी माहिती चांदूर रेल्वे पोलिसांनी दिली. एक अनोळखी व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये मृतावस्थेत पडल्याची माहिती राजना येथील पोलीस पाटलाने चांदूर रेल्वे पोलिसांना दिली होती. यानंतर केलेल्या चौकशीअंती मृताची अमित नारायण उपाध्याय अशी ओळख पटविण्यात आली. तर, दुसरीकडे अमितच्या आईच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हेही वाचा -  लव्ह मॅरेज केलं अन् त्याचं खरं रुप दिसलं, उच्चशिक्षित पत्नीसोबत पतीचं धक्कादायक कृत्य नेमकं काय घडलं - अमित हा 20 डिसेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास आरोपींच्या घरी राजणा येथे गेला. त्यावेळी त्यांचा वाद विवाद झाला. तो वाद विकोपाला जावून आरोपी पतीसह त्याच्या 20 व 19 वर्षे वयाच्या दोन मुलांनी त्याला दगड व बांबुच्या काठ्यांनी मारहाण करुन ठार मारले. तसेच खून केल्यानंतर सर्व आरोपी हे पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यांना त्यांना राजना येथुन अटक करण्यात आली. अमित उपाध्याय व प्रौढ आरोपीची पत्नी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. ती महिला एक वर्षांपासून अमितसोबत राहत होती. त्यामुळे आरोपींनी त्याचा राग मनात धरुन संगनमताने अमितचा खून केला. याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील किनगे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात