जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / छत्रपती शिवरायांनी आई जिजाऊंना लिहिलेल्या शेवटच्या पत्रात काय होतं? पाहा Video

छत्रपती शिवरायांनी आई जिजाऊंना लिहिलेल्या शेवटच्या पत्रात काय होतं? पाहा Video

छत्रपती शिवरायांनी आई जिजाऊंना लिहिलेल्या शेवटच्या पत्रात काय होतं? पाहा Video

शिवरायांच्या जन्मतिथीचा उल्लेख असलेल्या पत्राचा अमूल्य ठेवा देखील जवळून न्याहळण्याची संधी नागरिकांना आहे.

  • -MIN READ Local18 Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    नागपूर, 7 जानेवारी : शिवरायांच्या महानिर्वाण होण्याच्या अवघ्या सहा महिने आधी शिवाजी महाराजांनी आई जिजाऊंना एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र आज देखील उपलब्ध असून नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध झाले आहे. या पत्रासोबतच शिवरायांच्या जन्मतिथीचा उल्लेख असलेल्या पत्राचा अमूल्य ठेवा देखील जवळून न्याहळण्याची संधी नागपुरातील     आयोजित 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेस माध्यमातून झाली आहे. महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांच्या तेजस्वी पराक्रमाने एक मोठा क्रांतिकारी इतिहास घडला आहे. या इतिहासाच्या पानापानात आजही मराठी मन रममान होऊन त्या इतिहासाच्या स्मृतीतून प्रेरणा घेण्यासाठी प्रवृत्त होतो. राजा शिवछत्रपती म्हणजे तमाम मराठी जणांचे श्रद्धास्थान. याच शिवरायांच्या जीवनातील असंख्य पत्रे शिवरायांचे व्यक्तिमत्त्व, एकंदरीत जीवनप्रवास, इतिहासातील असंख्य घटना, अनेक जीवन प्रसंगांचा उलगडा करत असतात. नागपुरात आयोजित 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेस येथे रिसर्च फॉर रिसर्जन्स फाउंडेशनच्या वतीने  शिवकालीन अमूल्य ठेवा प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे. इतिहासातील असंख्य पैलू उलगडणारा हा अमूल्य ठेवा जवळून न्याहाळताना नागपूरकर भारावून जात असून त्या प्रदर्शनातील हे एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र ठरले आहे. रिसर्च फॉर रिसर्जन्स फाउंडेशन रिसर्चच्या क्षेत्रात काम करते. फेब्रुवारी 2016 रोजी व्हीएनआयटी सोबत कॉन्फरन्स घेऊन रिसर्च क्षेत्रात काम करण्यासाठी 2017 साली नोंदणी होऊन रिसर्च फॉर रिसर्जन्स फाउंडेशन ही संस्था अस्तित्वात आली. रिसर्च क्षेत्रात भारत हा रिसर्च सेंट्रल देश व्हावा या दृष्टीने इंडियन नॉलेज सिस्टमच्या दृष्टीने जे भारतात अथांग ज्ञानसंपदा आहे, भारत दर्शन आहे त्याचा अभ्यास व्हावा, त्याची माहिती इतरांना व्हावी आणि जो रिसर्च सुरू आहे त्यामध्ये त्यांचा उपयोग इतरांना देखील करता यावा  यासाठी संस्था प्रामुख्याने काम करत आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    महाराजांवरील पहिले हस्तलिखित पत्र आम्ही भारतातील सुमारे अडीच लाख ग्रंथसंपदा डिजिटल स्वरूपात आमच्या सर्वरवर उपलब्ध केला आहे. हा डिजिटल ठेवा पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच रिसर्च करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आमच्या नॉलेज रिसर्च सेंटर वरील सर्वर सर्वांसाठी उपलब्ध केला आहे. हा अमूल्य ठेवा आम्ही या प्रदर्शनात रिसर्च स्कॉलर्ससाठी बघण्याकरिता उपलब्ध केला आहे. त्यातलेच छत्रपती शिवाजी महाराजांवरील पहिले हस्तलिखित आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान पाहण्याची मोठी संधी 1679 रोजी लिहिलेलं पत्र 14 सप्टेंबर 1679 रोजी शिवरायांनी जिजाऊंना लिहिलेले शेवटचे पत्र इत्यादीसह असंख्य पैलू उलगडणारा अमूल्य ठेवा या प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांना तसेच पुढील संशोधनासाठी ही ज्ञानसंपदा उपयुक्त पडेल अशांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन रिसर्च फोर रिसर्जन विसर्जन फाउंडेशनच्या वतीने फाउंडेशनचे राजेंद्र पाठक यांनी केले आहे. 

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , nagpur
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात