विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 7 एप्रिल: गेल्या काही काळापासून सोन्या-चांदीच्या किमतीत दररोज मोठे चढ-उतार होत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात अल्पशी घसरण झाली आहे. गुरुवारच्या तुलनेत नागपूर सराफा बाजारात सोन्याच्या दरात 100 रुपयांची घट झाली. त्यामुळे आज 24 कॅरेट सोन्याचा दर 60 हजार 800 रुपयांवर आला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 57 हजार 800 रुपये इतका झाला आहे. त्यामुळे आज सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी चांगला दिवस आहे. चांदीच्या दरात 100 रूपयांची वाढ नागपूरकरांची सोन्यासोबतच चांदीच्या दागिन्यांनाही चांगली पसंती असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार सोन्यासोबत चांदीच्या दरातही चढ-उतार होत असतात. गेल्या काही काळापासून चांदीचा भाव 70 हजारांवर टिकून होता. परंतु गुरुवारी याच चांदीच्या दरात 1,100 रुपयांची घट झाली होती. आज परत चांदीच्या दरात 100 रुपयांची वाढ झाल्याने आज प्रती किलो चांदीचा दर 74,600 इतका आहे.
सोनं गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय महाराष्ट्रात विविध कार्यक्रम, सण, समारंभात मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केले जातात. तसेच उत्तम गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही सोन्या-चांदीकडे पाहिले जाते. परंतु, गेल्या काही काळात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ही वाढ आगामी काळात देखील होऊ शकते असा अंदाज सराफा व्यावसायिकांनी वर्तवला आहे. नागपूर शहरातील आजचा सोन्याचा दर 10 ग्रॅम 24 कॅरेट - 60,800 10 ग्रॅम 22 कॅरेट- 57,800 10 ग्रॅम 20 कॅरेट- 54,700 10 ग्रॅम 18 कॅरेट- 48,600 नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,080 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,780 10 ग्रॅम 20 कॅरेट- 5,470 1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,860 चांदीचे दर प्रतिकिलो - 74,600
Gold Price in Nashik : वीकेंडला सोनं खरेदी करण्याची नाशिककरांना संधी, पाहा काय आहे आजची किंमत
नागपूर शहरातील कालचा सोन्याचा दर 10 ग्रॅम 24 कॅरेट - 60,900 10 ग्रॅम 22 कॅरेट- 57,900 10 ग्रॅम 20 कॅरेट- 52,700 10 ग्रॅम 18 कॅरेट- 47,900 नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,090 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,790 10 ग्रॅम 20 कॅरेट- 5,270 1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,790 चांदीचे दर प्रतिकिलो - 74,500 टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)