Home /News /maharashtra /

Nagpur Tabla Market : तब्बल 200 वर्षांचा इतिहास असणाऱ्या नागपुराच्या तबला मार्केटबद्दल माहितीय का? नसेल तर VIDEO जरूर पहा

Nagpur Tabla Market : तब्बल 200 वर्षांचा इतिहास असणाऱ्या नागपुराच्या तबला मार्केटबद्दल माहितीय का? नसेल तर VIDEO जरूर पहा

title=

संगीतविश्वात 'तबला' अत्यंत महत्वाचं वाद्य आहे. त्यातून अनेक घराण्यांनी नाव कमावलं. पण, हा प्रसिद्ध वाद्य नागपुरमध्ये बनविलं जातं. नागपुरच्या मार्केटमधला (Nagpur Tabla Market) तबल्याला अख्ख्या भारतात मागणी आहे.

    नागपूर, 4 जून : संगीतातील महत्वाचं वाद्य म्हणदे तबला. संंगीतमय मैफिलीत तबला आणि तबला वाचविणारा लक्षात राहतोच. अशा तबल्याचं मार्केट नागपुरात आहे. त्याला २०० वर्षांचा इतिहास आहे. इथला तबला हा भारतभरात विकला जातो. मध्य भारतातून त्याल जास्त मागणी आहे. तर नागपूर -2 येथील जगन्नाथ बुधवारी  या परिसरात असलेलं हे तबला मार्केट अख्ख्या भारतात प्रसिद्ध (Famous Tabla Market in Nagpur) आहे. तर त्या तबला मार्केट विषयी जाणून घेऊया... या तबला मार्केटला तब्बल 200 वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे 200 वर्षांपासून इथं तबला निर्मिती केली जात आहे.  तबला कारागीर अजय नारकरी सांगतात की, "आता तबला निर्मितीमध्ये आमची चौथी पिढी आहे. माझे आजोबा, नंतर वडील, आता मी आणि माझी पुढची पिढी हेच काम करत आहे. तबला तयार करणे खूप अवघड आहे. कारण, तबला बनविण्यासाठी किमान 25-30 दिवस लागतात", अशी माहिती अजय नारकरी यांनी दिली.  ... कसा तबला बनविला जातो? "तबला बिनविणे हे कौशल्यचे काम आहे. एक तबला आणि डग्गा ही जोडी बनविण्यासाठी सुमारे १० ते २० दिवस लागतात. त्यात पूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तबला बनविण्यासाठी शिसम, आंबा किंवा कडूनिंब या झाडाच्या बुंध्याच्या लाकडाचा वापर करतात. त्यानंतर त्याला मधोमध कोरून पोकळ केलं जातं. त्यावर बकरीच्या कातडीपासून चामडे तयार केले जातं. मग ते त्यावर पसरविले जाते. त्याला दुसऱ्या प्रकारच्या कातडीने घट्ट बांधून घेतलं जातं", अशी माहिती तबला विक्रेत्यांनी दिली. वाचा : महत्त्वाची बातमी! संगीत क्षेत्रातील पदवीधरांसाठी मुंबई विद्यापीठात भरती; कोणाला मिळेल संधी? जाणून घ्या "तबला बनविण्याची प्रक्रिया इथंच थांबत नाही, तर तबल्याचा तालबद्ध लावण्यासाठी विशिष्ट पद्धतीची शाई तयार केली जाते. त्यावर घोटली जाते,  असे हे त्या शाईचे ४ ते ५ थर लावले जातात. त्यानंतर गुळगुळीत दगडाने त्याला एकरुप केले जाते. नंतर त्याला अजून तालबद्ध लावण्यात येते. अशा प्रकारे तबला आणि डग्गा तयार केले जातात", असंही तबला विक्रेते अजन नारकरी यांनी सांगितलं. तबला वादनात 'ही' घराणी आहेत प्रसिद्ध तबला वादन संगीताच खूप महत्वाचं आहे. या वाद्य वादनामध्ये अनेक घराणी तयार झालेली आहे. त्यांची विशिष्ट ओळख संगीत विश्वात आहे. या प्रमुख्य घराण्यांपैकी दिल्ली, लखनऊ, बनारस, पंजाब आणि इंदौर अशी घराणी प्रसिद्ध आहेत. याच तबला वादनामुळे जगामध्ये झाकिर हुसेन प्रसिद्ध आहेत.
    First published:

    पुढील बातम्या