मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्रातही प्रदेशाध्यक्ष निवडणूक घ्या! काँग्रेस नेत्याचीच पटोलेंना 'नाना'

महाराष्ट्रातही प्रदेशाध्यक्ष निवडणूक घ्या! काँग्रेस नेत्याचीच पटोलेंना 'नाना'

काँग्रेस नेत्याचा नाना पटोलेंवरच निशाणा

काँग्रेस नेत्याचा नाना पटोलेंवरच निशाणा

काँग्रेस मध्ये राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही निवडणूक प्रक्रियेने होत असेल तर मग प्रदेशाध्यक्ष पदाची पण निवडणूक घ्या? अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये परत एक नवीन वादाला तोंड फुटले आहे.

नागपूर, 16 सप्टेंबर : काँग्रेस मध्ये राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही निवडणूक प्रक्रियेने होत असेल तर मग प्रदेशाध्यक्ष पदाची पण निवडणूक घ्या? अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये परत एक नवीन वादाला तोंड फुटले आहे. नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी चक्क यावेळेस महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना थेट लक्ष्य केलं आहे. सध्या काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका सुरू आहे आणि या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष देखील निवडला जाणार आहे, त्यामुळे या प्रक्रियेतच प्रदेशाध्यक्षाची निवड देखील निवडणुकीच्या प्रक्रियेने व्हायला पाहिजे, अशी मागणी करत काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी नाना पटोला यांना डिवचले आहे. त्यांना विचारले असता की नाना पटोले यांना बाजूला सारून प्रदेशाध्यक्ष पदासाठी देखील निवडणूक घ्यायची का ? तर नाना पटोले हे नेमलेले प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना कधीही काढून फेकता येते या शब्दात त्यांनी याचं उत्तर दिलं. आशिष देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनाच नेते गांभिर्याने घेत नाहीत, हे आशिष देशमुख यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे.
First published:

Tags: Nana Patole

पुढील बातम्या