नागपूर, 14 जानेवारी : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर येथील कार्यालयात नितीन गडकरी यांना 3 वेळा फोन करून धमकी देण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने ही धमकी देण्यात आली असून 2 कोटी खंडणी मागितली आहे. गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉल प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण, हा फोन दुबई नाही तर बेळगाव तुरुंगातून आला आहे. नागपूरची टीम बेळगावला रवाना संबंधित कॉल एका सराईत गँगस्टरने केले असून तो सध्या बेळगाव तुरुंगात कैदेत आहे. तुरुंगाच्या आत त्याच्याकडे नियमबाह्य पद्धतीने असलेल्या फोनच्या माध्यमातून त्याने हे कॉल केल्याचे समोर आले आहे. गडकरी यांच्या कार्यालयात फोन कॉलच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचे नाव जयेश पुजारी असून तो हत्या प्रकरणात बेळगाव जेलमध्ये कैदेत आहे. या धमकी प्रकरणात एकटा जयेश पुजारी आणि त्याची टोळी आहे की अंडरवर्ल्डचे काही मोठे गँगस्टर यामागे आहेत, याचा तपास सध्या पोलीस करत आहे. नागपूर पोलिसांची एक टीम तातडीने बेळगावला रवाना झाली आहे. वाचा - पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ फोनमध्ये दाऊदचा उल्लेख एकूण 3 वेळा फोन करण्यात आले होते. 11.30 आणि 12.40 मिनिटाने फोन आले होते. फोनमध्ये दाऊद असा उल्लेख करण्यात आला होता. 2 कोटी रुपये द्या नाहीतर जीवे ठार मारू अशी धमकी फोनवरून देण्यात आली. या फोन कॉलनंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे धाव घेतली. फोन कुठून आला, कुणी केला आणि का केला, याचा तपास पोलीस घेत आहे. सायबर पोलिसांची एक टीम सुद्धा पोहोचली आहे. हा फोन कुठून आला होता. याचा शोध घेतला जात आहे. सध्या पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले आहेत आणि चौकशी करत आहे. सध्या नितीन गडकरी सुद्धा हे नागपूरमध्येच आहे. त्यामुळे कार्यालय आणि निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.