जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Abdul Sattar : चार तास स्वत:ला कोंडून घेतलेले अब्दुल सत्तार अवतरले, बाहेर येताच म्हणाले...

Abdul Sattar : चार तास स्वत:ला कोंडून घेतलेले अब्दुल सत्तार अवतरले, बाहेर येताच म्हणाले...

Abdul Sattar : चार तास स्वत:ला कोंडून घेतलेले अब्दुल सत्तार अवतरले, बाहेर येताच म्हणाले...

मागच्या 4 तासांपासून स्वत:ला कोंडून घेतलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार बाहेर आले आहेत. बाहेर आल्यानंतर सत्तारांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 26 डिसेंबर : नेहमी कोणत्या-कोणत्या कारणांनी चर्चेत राहणारे अब्दुल सत्तार पुन्हा एकदा विरोधकांच्या आरोपावरून चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या सत्तार यांच्यावर आता जमीन घोटाळ्याचा आरोप होतोय. सोबतच त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात होणाऱ्या कृषी प्रदर्शनासाठी कृषी विभागात पैसे वसूल करण्यात येत असल्याचा आरोपही सत्तार यांच्यावर करण्यात आला आहे. तर या सर्व प्रकरणावरून विरोधक आक्रमक होतांना दिसत आहे. तर सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील यावेळी करण्यात येत आहे.त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांच्यावर आरोप झाल्यावर सत्तारांनी स्वत:ला तब्बल 4 तास कोंडून घेतलं होतं. बाहेर आल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी माझ्यावर लागलेल्या सर्व आरोपांना विधानसभेत उत्तर देऊ, असं स्पष्टीकरण दिलं. यानंतर अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रामगिरी निवासस्थानाकडे निघाले. मुख्यमंत्र्यांना भेटून आपली बाजू मांडणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं.

एकाच दिवसात सत्तारांवर दोन आरोप कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात आलात. वाशिमच्या घोड बाभूळ परिसरातील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृत रित्या वाटप केल्याचा आरोप आहे. सत्तार यांच्या या निर्णयाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय. यावरून विधानसभेत अजित पवारांसह विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. सत्तार यांच्या विधानसभा मतदार संघात सिल्लोड महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मात्र हा महोत्सव कृषीखात्यातील अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलाय. मोहत्सवासाठी 15 कोटी रुपयांचा निधी गोळा करण्याचं टार्गेट कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी या पठाणी वसुलीचा पाढाचं विधानसभेत वाचला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात