बुलढाणा, 8 मार्च : राज्यात दिवसेंदिवस अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता बुलढाणा जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहगे. पाटाच्या पाण्यात पोहायला एक 9 वर्षांचा मुलगा गेला असता त्याच्यासोबत भयानक घटना घडली. काय आहे संपूर्ण घटना - पाटाच्या पाण्यात पोहायला गेलेल्या एका 9 वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू झाला आहे. तालखेड गावात ही दुर्दैवी घटना घडली. कुणाल वैतकार असे या मृत मुलाचे नाव आहे. मोताळा तालुक्यातील तालखेड येथे गावालगतच्या पाटाच्या पाण्यात कुणाल वैतकार हा 9 वर्षांचा चिमुरडा गेला होता. मात्र, त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कुणाल वैतकार, या 9 वर्षांच्या चिमुरड्याच्या दुर्दैवी मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. तसेच त्याच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. दहावीची परीक्षा संपल्याने मित्रांसोबत खेळायला गेला होता सत्यम; तिथेच झाला दुर्दैवी अंत पुण्यातही एकाचा बुडून मृत्यू - पुण्यातही एक धक्कादायक घटना घडली. इंद्रायणी नदीत बुडून एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. होळी साजरी केल्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत हातपाय धुण्यासाठी नदी पात्रात उतरला होता. मात्र, त्याचा तोल गेला आणि तो पाय घसरून पात्रात पडला. यावेळी तिथे असलेल्या त्याच्या मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला वाचवण्यात यश आलं नाही. अखेर त्याचा बुडून मृत्यू झाला. जयदीप पुरुषोत्तम पाटील (वय 21 रा. तारखेड, पाचोरा, जिल्हा जळगाव) असं या नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो तळेगाव परिसरातील आंबी येथे असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.