रवी सपाटे, प्रतिनिधी गोंदिया, 12 एप्रिल : गोंदियातून एक वेगळीच घटना समोर आली आहे. गोंदिया शहरात एका घरातून तब्बल 39 सापाची पिल्ले निघाली आहेत. गोंदियातील राजेश शर्मा यांच्या घरातून ही सापाची पिल्ले निघाली आहेत.
नेमकं काय घडलं - आपल्याला ऐकून आश्चर्य वाटले की, 39 सापाचे पिल्ले एकाच घरात कसे? पण हे खरंय. गोंदिया शहरात ही घटना घडली आहे. शास्त्री वार्ड येथील राजेश शर्मा यांचे घर जवळपास 20 वर्ष जुने आहे. त्यामुळे लाकडी दरवाज्याच्या फ्रेममध्ये वाळवी लागली होती. त्यामुळे घरमालकाने वाळवी काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना आतमध्ये काही तरी काळ्या रंगाची वस्तू दिसून आली.
गोंदियामध्ये एका घरात सापडली सापाची 39 पिल्लं pic.twitter.com/2E3MJT1NCw
— News18Lokmat (@News18lokmat) April 12, 2023
यावेळी त्यांनी आणखी खोदकाम केले. यावेळी आणखी खोदकाम केल्यावर त्यांना सापाचे पिल्ले आढळून आली. यानंतर याबाबतची माहिती सर्पमित्र बंटी शर्मा यांना देण्यात आली. सर्पमित्र घटनास्थळी पोहचत एका पाठोपाठ एक असे त्यांनी तब्बल 39 सापाचे पिल्ले बाहेर काढले. हे साप पाहून नागरिकांना धक्काच बसला. यानंतर एका प्लास्टिक बॉक्समध्ये ठेऊन त्यांना जंगलात सोडण्यात आले. हे बचावकार्य तब्बल 4 तास चालले. याठिकाणी तब्बल 39 सापांची पिल्ले आढळली. त्यांची लांबी हाताच्या तळव्यापेक्षा थोडी मोठी म्हणजे सुमारे 2 फूट होती. हे नवजात साप दोन आठवड्यांपूर्वीच जन्माला आले असावे, असे सर्पमित्रांनी सांगितले. त्यांना पकडल्यानंतर एका डब्यात टाकून गोंदियाजवळील पांगडी जंगल येथील नैसर्गिक अधिवास असलेल्या नाल्याजवळ सोडण्यात आले. या घटनेची परिसरात एकच चर्चा होत आहे. यानंतर सर्पमित्र बंटी शर्मा यांनी सांगितले की, पकडलेली सर्व 39 सापांची पिल्ले अलुकिल्बेक (तास्या) साप प्रजातीची आहेत. हे साप विषारी नसतात. साधारणपणे अंड्यातून पिल्लू बाहेर आल्यावर मादी साप त्या ठिकाणाला सोडून निघून जातो. वास्तविक शास्त्री वॉर्डातील या घराच्या अंगणात जुनी नाली होती. तसेच ती वापरात नव्हती. त्यामुळे दरवाजाच्या चौकटीत एक पाइप होता, तो जमिनीत शिरला होता. त्यामुळे सापांच्या मुलांना किडे वगैरे सहज खायला मिळायचे. या अन्नासाठी त्यांनी या चौकटीला आपली छावणी बनवली होती. सर्प मित्रांनी दरवाजाच्या चौकटीत साप दिसल्यावर हळूहळू चिमट्याने त्यांना सुखरूप बाहेर काढले असता आतून अनेक साप बाहेर येऊ लागले.