Home /News /maharashtra /

नागपुरातील 'जान' वाघिणीची कोरोना चाचणी, लक्षणं दिसल्याने प्रशासनानं तातडीने घेतला निर्णय

नागपुरातील 'जान' वाघिणीची कोरोना चाचणी, लक्षणं दिसल्याने प्रशासनानं तातडीने घेतला निर्णय

वाघिणीच्या नाकातून पाणी येत असल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर तिचीही चाचणी करण्यात आली.

    नागपूर, 21 मे : मानवापाठोपाठ आता प्राण्यांनाही कोरोनाचा (Corona in animals) धोका असल्याचं समोर येत आहे. काही प्राणी संग्रहालय (Zoo) आणि अभयारण्यांध्ये यासाठी प्राण्यांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. कारण काही ठिकाणी प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचंही पाहायला मिळालं होतं. आता नागपुरातही (Nagpur) प्राण्यांमध्ये कोरोना पसरतोय का अशी भीती निर्माण झाली आहे. त्याचं कारण म्हणजे नागपूरच्या प्राणी संग्रहालयातही एका वाघीणीची कोरोना चाचणी ( Nagpur tigress corona test) करण्यात आली आहे. मात्र ती चाचणी निगेटिव्ह आल्यानं सर्वांनी सुटकेचा नि:शवास टाकला. ( corona test of Jaan tigress in negative) नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयामध्ये विविध प्रकारचे प्राणी आहेत. याठिकाणी असलेल्या जान नावाच्या वाघीणीची तब्येत बिघडल्याच्या प्रशासनाच्या लक्षात आलं होतं. त्यानंतर जान या वाघीणीच्या नाकातून पाणी वाहायला सुरुवात झाली. त्यामुळं महाराजबाग प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनानं तातडीनं तीचीही कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. लगेचच या वाघीणीचे चाचणीसाठी नमुने घेण्यात आले. हे नमुने तपासणी करण्यासाठी भोपाळ येथील लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. मात्र प्राणी संग्रहालयातील वाघीणीला कोरोनाची लागण होण्याच्या भीतीने सर्वांच्याच चिंता वाढल्याचं पाहायला मिळालं. मात्र ही चाचणी निगेटिव्ह आल्यानं सर्वांना दिलासा मिळाला. हे ही वाचा-ही दृश्यं विचलित करू शकतात; नागपुरात बाप-लेकाचा बुडून मृत्यू, Live Video वाघाची कोरोना टेस्ट करण्याची नागपूर मधील पहिलीच घटना आहे. या वाघीणीच्या तपासणी केली असता तिला खोकला किंवा ताप असा काहीही त्रास नव्हता. त्यामुळं तिला औषधं न देता व्हिटॅमिन, मिनिरल असे इंजेक्शन देण्यात आले. तिची प्रतिकर शक्ती वाढवण्यासाठी औषधं देण्यात आली. त्यानंतर वाघीणीनं जेवणंही चांगलं केलं आणि तिला कोणताही त्रास नव्हता त्यामुळं तिला पुन्हा अधिकावासात सोडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. प्राणी संग्राहालयातील सर्वच प्राण्यांवर कर्मचारी बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. सर्वांच्या तब्येतीची काळजी घेतली जात आहे. तसंच एखाद्या प्राण्याला लक्षणं आढळली तर त्या प्राण्याची लगेचच चाचणी करून उपचार करण्याची खबरदारी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर घेत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पण कोरोनाचं हे संकट जर खरंच प्राण्यांमध्ये आणि त्यातही जंगलासारख्या परिसरात पसरलं तर ते प्रचंड धोकादायक ठरणार आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Nagpur, Tigar

    पुढील बातम्या