मुंबई, 08 मे: मुंबईकरांसाठी (Mumbai) एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न (water problem) आता मिटला आहे. आता मुंबईत समुद्रातल्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करुन गोडे पाणी मिळवण्यात येणार आहे. मुंबईत खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या नि:क्षारीकरण प्रकल्पाकरता 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई पालिकेनं (Mumbai Municipal Corporation) ‘सर्वांसाठी पाणी’ हे नवे धोरण जाहीर केलं आहे. गोरेगाव पूर्व येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यानात या योजनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ करण्यात येत आहे. काय होणार फायदा या प्रकल्पाद्वारे मुंबईकरांना रोज समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून 200 दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळणार आहे. मुंबईची दैनंदिन पाण्याची गरज सुमारे 4,200 दशलक्ष लीटर असून सध्या होणारा पुरवठा 3,800 दशलक्ष लिटर आहे. पालिकेच्या जलविभागामार्फत पाणीपुरवठ्याचं नियोजन केलं जातं. दिवसामागे 25 ते 30 टक्के म्हणजे दररोज सुमारे 900 दशलक्ष लीटर पाण्याची चोरी, गळती होते. त्यामुळे मुंबईकरांना दररोज सुमारे 2,900 दशलक्ष लिटर एवढेच पाणी मिळतं. उर्वरित तूट भरून काढण्यासाठी पालिकेचं धोरण महत्त्वाचं ठरणार असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तसंच मुंबईकरांना खाऱ्या पाण्यातून गोडं पाणी मिळणार आहे. मुंबईत खाऱ्या पाण्यापासून गोडं पाणी तयार करण्याच्या नि:क्षारीकरण प्रकल्पाकरता 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाद्वारे दिवसाला समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून 200 दशलक्ष लिटर गोडं पाणी मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. सर्वांसाठी पाणी धोरणांतर्गत खालील आधारांवर जलजोडणी दिली जाईल, 1. निवासस्थानांसाठी जलजोडणी अस्तित्वात असलेल्या नियमांनुसार, पूर्वग्रह न ठेवता मंजूर केली जाईल. 2. सुधारित देण्यात आलेठी जलजोडणी कोणत्याही प्राधिकरणाला अथवा विभागीय अधिकारयांना कोणत्याही कायद्यान्वये अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या अधिकारापासून अडवू शकणार नाही. 3. बांधकाम पाडल्यानंतर / निष्कासित केल्यानंतर जलजोडणी खंडित होण्याच्या कारवाईस पात्र आहे. 4. आतापर्यंत नाकारलेल्या वर्गाना या धोरणातर्गत देण्यात येणारी निवासी जल जोडणी ही पूर्णपणे मानवतावादी दृष्टिकोनावर आधारित मूलभूत सुविधा आहे. अशी जल जोडणी मंजूर केल्याने अर्जदाराला जमिनीच्या मालमत्तेच्या मालकीबाबत कोणताही अधिकार प्राप्त होत नाही. सदर जलजोडणीची कागदपत्रे कोणत्याही मंच किंवा न्यायालयासमोर कोणत्याही मालमतेच्या शीर्षकाच्या मालकीचा दावा करण्यासाठी जलजोडणीसंदर्भातील कागदपत्रे समर्थनीय दस्तऐवज म्हणून सादर केली जाऊ शकणार नाहीत बेकायदेशीर संरचनेच्या अधिकृततेचा किंवा जमीन / मालमत्तेचा मालकी स्वीकारण्याचा पुरावा म्हणून वापरली जाणार नाहीत. अशी निवासी जल जोडणी दिल्यानंतर कोणत्याही प्राधिकरणाला / विभागाला वेगवेगळ्या कायद्यानुसार आणि अधिकृत कायद्यांतर्गत अनधिकृत बांधकामे केव्हाही निष्कासित करण्याच्या कारवाईपासून प्रतिबंधित करत नाही. सर्व अर्जदाराना जल अभियंता विभागाला हमीपत्र द्यावे लागेल की ते या कलमाशी सहमत आहेत आणि भविष्यात ते या कलमाचे पालन करतील. 5. सदर जलजोडणी, प्रचलित जल आकार नियमामावली 2015 आणि नंतर वेळोवेळी सुधारीत केलेल्या यथायोग्य दराने आकारले जातील. 6. अर्जदारास खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र निवासी पुरावा म्हणून सादर करावे लागेल: विजेचे देयक / महानगर गैस देयक / आधार कार्ड / निवडणूक ओळखपत्र/ पारपत्र / वाहनचालक परवाना/ शिधापत्रिका/ बैंक पासबुक/ जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेला फोटो पास. 7. अर्जदारास खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र ओळखीचा पुरावा म्हणून सादर करावे लागेल. आधार कार्ड / निवडणूक ओळपत्र / पारपत्र / वाहनचालकाचा परवाना/ बैंक पासबुक फोटोसहित /पोस्ट ऑफिस पासबुक फोटोसहित / पॅन कार्ड फोटोसहित 8. कोणत्याही सी. 1 श्रेणीतील जीर्ण इमारतीला / बांधकामांना जलजोडणी देण्यात येणार नाही. 9. या धोरणांतर्गत रस्ते आणि फुटपाथवर असलेल्या अनधिकृत बांधकामांना जलजोडणी दिली जाणार नाही. 10. जिथे अर्जदाराचे बांधकाम / झोपडीच्या जवळपास पाणी वितरण जाळे उपलब्ध नाही अशा ठिकाणी संबंधित सहाय्यक अभियंता (जलकामे) सदर जागेची तपासणी करून तेथे पाणी वितरण जाळे टाकण्याचे प्रस्ताव तयार करतील यादरम्यान, अर्जदाराने उपलब्ध पाणी वितरण जाळ्यातून व उपलब्ध असलेल्या पाणीदाबात पाणीपुरवठ्याचा लाभ घेण्यास संमती दिल्यास सहाय्यक अभियंता (जलकामे) अर्जदारासह सदर जागेची तपासणी करून अर्जदारास उपलब्ध पाणी वितरण जाळे व पाण्याचा पुरेसा दाब असलेल्या स्थळाबाबत अर्जदारास माहिती करून देतील अर्जदारास सदर ठिकाणी स्वखर्चान सार्वजनिक मोरी बांधावी लागेल. भविष्यात योग्य पाणी वितरण जाळे उपलब्ध झाल्यानंतर अर्जदाराची इच्छा असल्यास अर्जदाराच्या खर्चाने पाणी जोडणी स्थलांतरित केली जाईल. तथापि, अशा ठिकाणी जल जोडणी घेण्यास अर्जदारांनी समती न दिल्यास त्यांच्या अर्जावर पाणी वितरणाचे जाळे टाकल्यानंतर विचार केला जाईल 11. या धोरणांतर्गत मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 92 अन्वये पाण्याची जोडणी मंजूर केली जाईल व ते प्रचलित जल आकार नियमावली, जल उपविधी इ. यांतील तरतुदी अधीन राहून असेल. 12. कोणतीही जलजोडणी देताना, करनिर्धारण व सकलन विभागाव्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही. सर्वांसाठी पाणी धोरणांतर्गत खालील निवासी श्रेणीकरिता आहे, अ. झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी ब. अनधिकृत बिगर झोपडपट्टी निवासी बांधकामासाठी क. गावठाण आणि कोळीवाडयातील निवासी बांधकामे ड. इतर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.