मुंबई, 26 सप्टेंबर : लहान मुलं चालतीफिरती झाली की त्यांना फार जपावं लागतं. उत्सुकतेपोटी ते कोणत्याही वस्तूला हात लावतात. अशात काळजी घेतली नाही तर अपघातही होऊ शकतो. अशाच एक धक्कादायक घटना मुंबईतील नालासोपारा पूर्वेकडील आचोळे डोंगरी येथील एकता वाल्मिकी वेल्फेअर सोसायटी चाळीत घडली आहे. या ठिकाणी एका अडची वर्षाच्या चिमुकल्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काय आहे घटना? मुंबईतील नालासोपारा पूर्वेकडील आचोळे डोंगरी येथील एकता वाल्मिकी वेल्फेअर सोसायटी चाळीत राहणाऱ्या अंश कागडा या अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अंशचे वडील देव कागडा हे घरात आंघोळीकरिता गरम पाणी करण्यासाठी बादलीमध्ये हिटर लावून बाथरूमला गेले. त्यांचा लहान मुलगा अंश हा खेळता खेळता हिटर लावलेल्या बादलीजवळ गेल्यावर त्याला शॉक लागून मृत्यू झाला आहे. आचोळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हिटर वापरताना जपून.. बीडमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. हिटरमधील उकळते पाणी झोपलेल्या महिलेच्या अंगावर पडल्याने, गंभीर भाजलेल्या 31 वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बीडच्या पिंपळगाव येथे आज पहाटेच्या सुमारास घडली. उषा रंजीत सुरवसे (वय 31) रा. पिंपळगाव ता. माजलगाव असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाचा - चंद्रपूर हादरलं, एकाच कुटुंबातील 4 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू उषा सुरवसे ह्या रात्री 10 च्या सुमारास झोपताना हिटर सुरू करून झोपल्या होत्या. दरम्यान रात्रभर हिटर सुरु असल्याने तो गरम होऊन प्लास्टीकच्या टाकीतील पाणी उकळत होते. दरम्यान त्या टाकीची क्षमता संपल्याने ती टाकी फुटली. यावेळी उषा ह्या त्या टाकीला लागून झोपल्या असल्याने त्यांच्या अंगावर पाणी पडले. यामध्ये त्या गंभीररित्या भाजल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. जखमी उषा सुरवसे यांच्यावर आंबेजोगाई येथील स्वाराती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान मयत उषा सुरवसे यांच्या पश्चात पती, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.