मुंबई, 1 सप्टेंबर : भाजप नेत्या पंकजा मुंडे या आज अँकरच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या. यानिमित्ताने पंकजा मुंडेंमधील विविध कलांची जनतेला ओळख झाली. न्यूज मेकर पंकजा मुंडेनी आज पत्रकारांना प्रश्न विचारले. आणि पत्रकारांनीही खुलेपणाने त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. आज ठिकठिकाणी दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन सुरू आहे. यादरम्यान पंकजा मुंडेंनी पुणे आणि मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधला आणि तेथील परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली.
काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे या बस बाई बसच्या मंचावर दिसल्या होत्या. यावेळीही त्यांनी खुलेपणाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली. याशिवाय झी मराठीच्या उंच माझा झोका या कार्यक्रमातही त्या दिसून आल्या होत्या. यावेळी त्यांनी सूत्रसंचालन केलं. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे अशा विविध प्लॅटफॉर्मवर सक्रिय झाल्याच्या दिसून येत आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार असलेल्या पंकजा मुंडेंना पक्षाकडून डावललं जात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्या भाजपला राम राम ठोकणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. मात्र भाजपच्या नेत्यांकडून वारंवार या अफवा असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय पंकजा मुंडेंनी याबाबत अद्याप आपली अधिकृत भूमिका मांडलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Live video, Pankaj munde