मुंबई, 3 मार्च : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी आज संपत असल्याने नवाब मलिकांना पुन्ही न्यायालयात हजर केले. यावेळी ईडीकडून नवाब मलिक यांच्या आणखी सहा दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी न्यायालयात केली. त्यावर नवाब मलिकांच्या वकीलांनी त्याला विरोध केला. तसेच या सुनावणी दरम्यान एक नवी माहिती समोर आली आहे. नवाब मलिक यांनी हसीना पारकरला (Haseena Parkar) 55 लाख नाही तर 5 लाख रुपये दिले होते. 55 लाख रुपये दिले ती एक टायपिंग चूक होती अशी माहिती ईडीच्या वकीलांनी दिली आहे. न्यायालयात नेमकं काय घडलं? न्यायालयात ईडीच्या वकीलांनी म्हटलं, नवाब मलिक यांच्या इडी कोठडीची आवश्यकता आहे. नवाब मलिक हे तब्येतीच्या कारणास्तव हॉस्पिटलमध्ये दाखल होते. यामुळे त्यांचा जबाब पूर्ण घेता आली नाही तशीच त्यांची पुर्ण चौकशी करता आली नाही. नवाब मलिक यांच्या 6 दिवसांच्या इडी कोठडीची मागणी ASG अनिल सिंग यांनी केली. वाचा : फडणवीस संतापले म्हणाले, “दाऊदची बहिण हसीना पारकरला मलिकांनी पैसे दिले, बाळासाहेब ठाकरे असते तर…” सरदार खान हा ताब्यात आहे त्याचा जबाब घेण्यात आला. सरदार खानचा जबाब कोर्टाला वाचण्याकरता दिला होता. ईडीचे वकील अनिल सिंग यांनी म्हटलं, आरोपी सरदार शहवली खान याने दिलेल्या जबाबातील तपशील पाहता नवाब मलिक यांची अधिक चौकशी करायची आहे. त्याचबरोबर या प्रकरणात आम्ही आणखी काहींचे जबाब नोंदवले आहेत यामुळे नवाब मलिक यांची कोठडी मिळावी. वाचा : ‘दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा घ्या’ मलिकांच्या राजीनाम्यासाठी BJP आक्रमक ईडीच्या वकीलांनी पुढे म्हटलं, या प्रकरणातील व्यवहार पाहता याशिवाय या प्रकरणात अधिक माहिती समोर येत आहे, आधीच्या रिमांड ॲप्लिकेशनमध्ये वेगवेगळे ट्रान्झॅक्शन नमूद आहेत. हसीना पारकरच स्टेटमेंट, जेलमध्ये असलेल्या दोषींचे स्टेटमेंट, मालकीण असलेली मुनिराचं स्टेटमेंट आहे. या संदर्भात मलिक यांची चौकशी करायची आहे. यावर नवाब मलिक यांचे वकील अॅड अमित देसाई यांनी म्हटलं, 55 लाख हसीना पारकरला दिल्याचा दावा केला, टेरर फँडिंगचा आरोप केला पण आता मात्र, ईडी सांगत आहे की टाईप करताना चूक झाली आहे. आज रिमांडमध्ये 5 लाख म्हणत आहेत, या चुकीमुळे मलिक यांनी ईडी कोठडीत रहावे लागले आहे, ईडीने नीट गृहपाठ करावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.