मुंबई, 8 फेब्रुवारी: एक मुस्लिम तरुणी हिजाब परिधान करुन महाविद्यालयात प्रवेश करताच काही तरुणांनी तिच्या विरोधात घोषणाबाजी केली असा एक व्हिडीओ मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avahad) यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना जितेंद्र आव्हाड यांनी सतंप्त प्रतिक्रियाही दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत काही तरुण भगवा झेंडा दाखवत हिजाब घातलेल्या तरुणीसमोर हुल्लडबाजी करताना दिसून येत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी म्हटलं, “एका भगिनीला असे छळून काय मिळते ह्या भक्तांना, विद्वेधाचे राजकारण भारताला पाकिस्तान च्या पंक्तीला नेऊन बसवेल एक दिवस. #हे_राम”.
एका भगिनीला असे छळून काय मिळते ह्या भक्तांना
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 8, 2022
विद्वेधाचे राजकारण भारताला पाकिस्तान च्या पंक्तीला नेऊन बसवेल एक दिवस #हे_राम pic.twitter.com/kNFSVFupYq
जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत दिसत आहे कि, एक मुस्लिम तरुणी हिजाब परिधान करुन दुचाकीवरुन महाविद्यालयात प्रवेश करते, यावेळी काही हिंदुत्ववादी तरुण तिच्याविरोधात घोषणा देण्यास सुरुवात करतात. तसेच तिला भगवे झेंडे सुद्धा दाखवतात. यावेळी हे तरुण जय श्री राम च्या घोषणा देत आहेत तर हिजाब परिधान केलेली तरुणी अल्ला हू अकबर म्हणताना दिसत आहे. वाचा : लता मंगेशकरांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत काँग्रेसवर मोठा आरोप, म्हणाले… काय आहे प्रकरण? झालं असं कि, महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यात हिजाबवरुन राजकीय वातावरण चांगलाच वाद निर्माण झाला आहे. महाविद्यालयात तरुणींना हिजाब परिधान करण्यास मनाई करण्यात आली आहे. हे प्रकरण इतकं तापलं कि हा वाद आता थेट न्यायालयात पोहोचला आहे. कर्नाटकातील विद्यार्थीनींना हिजाब परिधान करुन महाविद्यालयात प्रवेश नाकारला. त्यानंतर हा वाद सुरू झाला. या प्रकरणी काही मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात या विरोधात आवाज उठवला. एकीकडे या निर्णयाच्या विरोधात मुस्लिम मुली आक्रमक झाल्या आहेत तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटना, विद्यार्थी भगवा गमचा परिधान करुन आपला विरोध दर्शवत आहेत. यापूर्वीही जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला होता व्हिडीओ
चार दिवसांपूर्वी म्हणजेच 4 फेब्रुवारी रोजीही जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. यात दिसत आहे की, तरुणींनी हिजाब परिधान केला असल्यामुळे त्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जात नाहीये. हा व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं, “बेटी बचाओ, बेटी पढाओ हे केंद्र सरकारचं धोरण आहे. पण मुस्लिम मुली असल्यास बेटी हटाओ असा अजेंडा सुरू असल्याचं दिसत आहे.”