जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ''राज ठाकरे आणि सहपरिवार...'', मनसेच्या 'त्या' पत्रावर भडकल्या किशोरी पेडणकेर

''राज ठाकरे आणि सहपरिवार...'', मनसेच्या 'त्या' पत्रावर भडकल्या किशोरी पेडणकेर

''राज ठाकरे आणि सहपरिवार...'', मनसेच्या 'त्या' पत्रावर भडकल्या किशोरी पेडणकेर

शिवसेना भवनात हनुमान चालिसा आणि आरती करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी, या पत्रातून करण्यात आली आहे. आता या पत्रावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 एप्रिल: मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेली हनुमान चालिसा रथ यात्रा (Hanuman Chalisa Rath Yatra) रद्द करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना मनसेनं (MNS) पत्र लिहिलं आहे. या यात्रेवर कारवाईचा बडगा उचलल्याने महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसंच माहिम विधानसभा अध्यक्ष यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. शिवसेना भवनात हनुमान चालिसा आणि आरती करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी, या पत्रातून करण्यात आली आहे. आता या पत्रावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी (Mumbai Mayor Kishori Pednekar) यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांना सहकुटूंबासह परिवाराला आरती करायाला परवानगी द्या असे पत्र लिहा, अशी किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. आता शिवसेना भवनाची आठवण येतेयं का?, असा सवाल ही किशोरी पेडणेकर यांनी मनसेला विचारला आहे.

जाहिरात

सेनाभवनामध्ये आरती हनुमान चालीसा पठण करू द्या ही मागणी मोठी स्टंटबाजी आहे, अशी टीका महापौर यांनी मनसेवर केली आहे. जनतेला कनव्हिंन्स करता येत नाही म्हणून कन्फ्युज करण्यासाठी सुपारी घेऊन मनसे बोलते, असा हल्लाबोल किशोरी पेडणेकर यांनी मनसेच्या पत्रावर केला आहे. संजय राऊतांची प्रतिक्रिया दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनसे ने सेना भवनात हनुमान चालीसा पठण करण्याची परवानगी मागितली यावर विचार करु असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मनसेनं मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र जशाच्या तसं सन्माननीय उद्धवजी साहेब रविवारी रामनवमीचे औचित्य साधत महाराष्ट्र सैनिकांनी हनुमान चालिसा रथ यात्रेचे आयोजन केले होते. याचा शुभारंभ मंदिराप्रमाणे असणाऱ्या शिवसेना भवन इथून करण्यात आला. मात्र यावर सरकारने ती रथ यात्रा रद्द करत उलट आमच्यावर कारवाईचा बडगा उचलला. सदर रथ श्रीराम उत्सवाच्या ठिकाणी तसेच राम मंदिराच्या ठिकाणी लावला जाणार होता. ज्यापद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले तसेच अत्याचार राज्याचे मुख्यमंत्री आमच्यावर करत आहेत, अशी आमची भावना झाली तर गैर काय? आम्ही सुद्धा हिंदू आहोत सेनाभवनला शिवसैनिक आणि मुख्यमंत्री मंदिर मानतात मग हनुमान चालीसा लावली तर इतका द्वेष का असावा. आम्ही हिंदुस्थानात आहोत की पाकिस्तानात हेच समजेनासे झालेय. तुम्ही तुमच्या भाषणातून अनेकवेळा आम्ही जनतेच्या हितासाठी हिंदुत्वसाठी महाविकास आघाडी बरोबर एकत्र आलो असल्याचे वक्तव्य केलेत. आमचा मुद्दा एकच जर तुम्ही हिंदुत्वसाठी एकत्र आलात तर मग मनसैनिकांनी हनुमान चालीसा वाजवील्यावर तुम्हाला कारवाई का करावीशी वाटली? जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात, मग सतत आम्ही हिंदुत्व सोडले नाही असे का बोलावे लागते याचे उत्तर आपण द्याल का?. ‘‘आमचा कुठल्याही धर्माबद्दल अथवा त्यांच्या प्रार्थनेला विरोध नाही मात्र ते ज्या पद्धतीने एकतर्फी कारवाई होत आहे, त्या पद्धतीला विरोध आहे. एरवी आम्ही रमजानच्या दिवसात मुस्लिम बांधवांच्या घरी जातो तसेच गणेशोत्सवात ते आमच्या घरी येतात.’’ मी संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही अशी टीका टिपणी आदित्य यांनी केली मग पक्ष संपलेला असेल तर तुम्हांला कारवाईचा आधार का घ्यावा लागतो. मनसेच्या वसंत मोरे यांना फोन का करावा लागतो? गेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्या मित्राच्या फोनवरून मला पक्षात येण्यासाठी फोन करण्याची गरज का भासली? करोडो रुपये खर्च करून नगरसेवक का पळवावे लागतात?.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात