मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या मल्लिकार्जून खरगेंच्या अडचणीत वाढ, मुंबईतील मते फुटण्याची भिती

अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या मल्लिकार्जून खरगेंच्या अडचणीत वाढ, मुंबईतील मते फुटण्याची भिती

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे मल्लिकार्जून खरगे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे मल्लिकार्जून खरगे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे मल्लिकार्जून खरगे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 ऑक्टोबर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात एकडीकडे भारत जोडो यात्रा सुरू आहे. तर दुसरीकडे पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार मोर्चेबांधणी करत आहेत. या संदर्भात आता मोठी बातमी आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले मल्लिकार्जुन खरगे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मतांचे विभाजन होण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण, मुंबईमधील मते फुटण्याची शक्यता आहे.

खरगे यांचे विरोधी शशी थरूर यांना मुंबईचे मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये 400 मते असून मुंबईमध्ये 200 मते आहेत. मुंबईत 200 मतापैकी 100 पेक्षाजास्त मते शशी थरूर यांना मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. खरगे हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या पसंतीचे उमेदवार आहे.

खरगे आणि थरूर दोन उमेदवार रिंगणात

काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज मागे घेण्याची आज 8 ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती. मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार शशी थरूर यांच्यात काँग्रेस अध्यक्ष पदासाठी लढत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे दोनच उमेदवार आहेत. के.एन.त्रिपाठी यांचे उमेदवारी अर्ज यापूर्वीच रद्द करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचे शशी थरूर यांनी आधीच सांगितले आहे. शशी थरूर म्हणाले की, मी काँग्रेस कार्यकर्त्यांची फसवणूक करणार नाही.

वाचा - धनुष्यबाणासाठी रणकंदन, निवडणूक आयोगाच्या कार्यालयात वेगवान घडामोडी

मल्लिकार्जुन खरगे निवडणूक प्रचारात व्यस्त

शशी थरूर यांच्याप्रमाणेच मल्लिकार्जुन खर्गेही आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचे म्हणत आहेत. त्यांनी 7 ऑक्टोबरपासून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. अहमदाबादमधून प्रचाराला सुरुवात करणारे मल्लिकार्जुन खरगे मुंबईलाही भेट देणार आहेत. यानंतर ते तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खरगे येत्या पाच दिवसांत किमान 10 राज्यांच्या राजधान्यांना भेट देतील. तसेच राज्यातील कार्यकर्त्यांना भेटून त्यांचा पाठिंबा घेणार आहे.

17 ऑक्टोबरला होणार मतदान

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत रोमांचक होत आहे. यापूर्वी या शर्यतीत अनेक नावे होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे अध्यक्षपद जवळपास निश्चित झाले होते, मात्र जयपूरमधील राजकीय घडामोडीने सर्व समीकरणे बदलून टाकली. आता शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खरगे या शर्यतीत आहेत. अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दोन उमेदवार रिंगणात असतानाच हे मतदान होणार आहे. एकच उमेदवार उभा राहिला तर तो बिनविरोध निवडून येईल.

गांधी परिवार अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी विविध राज्यातील प्रदेश काँग्रेस कमिट्यांनी राहुल गांधी यांची अध्यक्ष म्हणून निवड करावी, असे ठराव केले होते. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारण्याची मागणी केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी ते अध्यक्ष होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा जोरदार पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी पक्षाचं अध्यक्षपद सोडलं होतं. सोनिया गांधी यांनी प्रभारी अध्यक्ष म्हणून त्यानंतर पक्षाचं काम पाहिलं. त्यापूर्वी 19 वर्षे अध्यक्ष म्हणून त्या कार्यरत होत्या.

First published:
top videos

    Tags: Shashi tharoor