नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काल (24 फेब्रुवारी 2022) ट्विट करत महाविकास आघाडी सरकार **(Mahavikas Aghadi Government)**मधील 12 नेत्यांची यादी जाहीर केली. या यादीतील नेत्यांचा किरीट सोमय्या यांनी “डर्टी डझन” (Dirty Dozen) असा उल्लेख केला आहे. तसेच या नेत्यांवर किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. याच 12 नेत्यांची यादी घेऊन आता किरीट सोमय्या दिल्लीत दाखल झाले आहेत. किरीट सोमय्या दिल्लीत अधिकाऱ्यांची घेणार भेट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलं, “ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी आज दिल्ली येथे विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.”
I am meeting various officials today at Delhi to pursue actions against Scams of "Dirty Dozen" Minister/Leaders of Thackeray Sarkar
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 25, 2022
ठाकरे सरकारच्या "डर्टी डझन" नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी आज दिल्ली येथे विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे@BJP4India
तसेच किरीट सोमय्या हे दिल्लीत एक पत्रकार परिषद सुद्धा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी किरीट सोमय्या आता आरोपांचा कुठला नवा बॉम्ब फोडतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. वाचा : नवाब मलिक यांची चिठ्ठी मुख्यमंत्र्यांनीच उचलली, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या यादीत कुणाची नावे? अनिल परब संजय राऊत सुजीत पाटकर भावना गवळी आनंद अडसूळ अजित पवार हसन मुश्रीफ प्रताप सरनाईक रवींद्र वायकर जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख नवाब मलिक
Thackeray Sarkar's Dirty Dozen
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 24, 2022
Anil Parab
Sanjay Raut
Sujeet Patker
Bhavna Gavali
Anand Adsul
Ajit Pawar
Hasan Mushriff
Pratap Sarnaik
Ravindra Waikar
Jitendra Awhad
Anil Deshmukh
Nawab Malik
Ghotalebajoko Hisaab Dena Padega@BJP4India@BJP4Maharashtra
“डर्टी डझन"च्या यादीत आणखी दोन नेत्यांची नावे किरीट सोमय्या यांनी काहीवेळापूर्वी आणखी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये किरीट सोमय्यांनी म्हटलं, ठाकरे सरकारमधील ‘डर्टी डझन’ नेत्यांच्या यादीत आणखी दोन नेत्यांची नावे मी विसरलो. ही नावे आहेत यशवंत जाधव, यामिनी जाधव कुटुंबीय आणि महापौर किशोरी पेडणेकर.
शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची धाड शिवसेनेचा (Shiv Sena) आणखी एक नेता केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. मुंबईच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (BMC Standing Committee Chairman Yashwant Jadhav) यांच्या घरी तपास यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे. येत्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीपूर्वी होत असलेल्या या कारवाईमुळे चर्चांना उधाण आले आहे. आयकर विभागाकडून ही चौकशी सुरू असल्याची आता माहिती समोर आली आहे.