जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Amey Khopkar : 'भोंगा सहन करतोय ना, मग...' 'त्या' ट्वीटवरून मनसे नेत्याची थेट धमकी

Amey Khopkar : 'भोंगा सहन करतोय ना, मग...' 'त्या' ट्वीटवरून मनसे नेत्याची थेट धमकी

Amey Khopkar : 'भोंगा सहन करतोय ना, मग...' 'त्या' ट्वीटवरून मनसे नेत्याची थेट धमकी

मनसेकडून पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मनसे नेते अमेय खोपकर आणि मनोज चव्हाण यांनी केलेल्या ट्वीटमुळे जोरदार चर्चा रंगली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑक्टोबर : मागच्या सहा महिन्यांपूर्वी मनसेने मशिदींवरील भोंग्यांवरून जोरदार विरोध केला होता. या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलच तापलं होतं. दरम्यान पुन्हा हा वाद ऐरणीवर आला आहे. मनसेकडून पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मनसे नेते अमेय खोपकर आणि मनोज चव्हाण यांनी केलेल्या ट्वीटमुळे जोरदार चर्चा रंगली आहे. मध्यरात्री फटाके खूप वाजत असल्याचे मुंबई पोलिसांना एका व्यक्तीने ट्वीट केले होते. यावरून अमेय खोपकर आणि मनोज चव्हाण यांनी आक्रमक पावित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.

जाहिरात

काल (दि.24) दिवाळी असल्याने राज्यात जोरदार साजरी करण्यात आली. रात्रभर फटाके उडत असल्याने ट्वीटरवर एका ट्विटरला एका व्यक्तीने पोलिसांना टॅग करत रात्रीच्या वेळी फटाके वाजत असल्याची तक्रार केली. सलमान खान नावाच्या व्यक्तीने रात्रीचे दोन वाजले तरी कांदिवलीतील गणेश नगर येथे फटाके फोडले जात असल्याचं ट्वीट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये केनिल नावाच्या व्यक्तीने पहाटे 4.30 वाजता फटाके फोडले जात असल्याची तक्रार केली होती. मुंबई पोलिसांनी या दोन्ही ट्वीटरला उत्तर देत संबंधितांना कळवण्यात आल्याचे सांगितले.

जाहिरात

हे ही वाचा :  दिवाळीच्या मुहूर्तावर दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत फडणवीसांनीच फोडला बॉम्ब

यावर अमेय खोपकर यांनी ट्वीट करत थेट त्यांना इशारा दिला आहे. ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय,देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही.आमचा सण आहे,आम्ही फटाके वाजवणारच.आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना,मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा असे सांगितले.

जाहिरात

हे ही वाचा :  मनसेसोबत महायुतीच्या चर्चेला लागणार ब्रेक? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठ विधान

दरम्यान ,मनोज चव्हाण यांनी या ट्विटचे स्क्रीनशॉट शेअर करत त्यांनीही जोरदार टीका केली आहे. विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल. आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होत आहे. आम्ही रोज फटाके फोडत नाही, मात्र तुमची अजान अजूनही अनेक ठिकाणी भोंग्यावर सुरू आहे. थोडं सहन करा कारण दिवाळी आहे,” असं ते म्हणाले आहेत.

जाहिरात

“ट्विट पाहून माझी तळपायाची आग मस्तकात गेली. देवाच्या नावाखाली वर्षानुवर्ष आम्ही यांचे अजान ऐकत आहोत, आम्ही ते सहन करतोय ना. दिवाळी तर फक्त चार दिवस असते. काल पहिला दिवस असल्याने पहाटे लोक उठणारच. त्यांना इतका त्रास होत असेल तर त्यांच्या अजानचा आम्हाला किती त्रास होतो हे पाहिलं पाहिजे. माझा विषयच हा होता की, जसे हे सगळे एकत्र येतात आणि पोलिसांना ट्वीट करणं वैगेरे गोष्टी करतात. तशाच प्रकारे हिंदूही एकवटणं गरजेचं आहे. आपण एकवटलो तरच प्रत्युत्तर देता येईल,” असं मनोज चव्हाण यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात