जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एअर बॅग उघडली, महागडी मर्सिडीज कार, तरीही सायरस मिस्त्री यांचा जीव गेला, कसा झाला अपघात?

एअर बॅग उघडली, महागडी मर्सिडीज कार, तरीही सायरस मिस्त्री यांचा जीव गेला, कसा झाला अपघात?

एअर बॅग उघडली, महागडी मर्सिडीज कार, तरीही सायरस मिस्त्री यांचा जीव गेला, कसा झाला अपघात?

Cyrus Mistry News: टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचे रविवारी पालघरजवळ एका रस्ते अपघातात निधन झाले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पालघर, 4 सप्टेंबर : टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचे रविवारी पालघरजवळ एका रस्ते अपघातात निधन झाले. कारमध्ये एकूण 4 जण होते. सायरस यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर 2 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या वापी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान सायरस मिस्त्री महागड्या मर्सिडीज कारमध्ये प्रवास करत होते. ही कार सर्वात सुरक्षित मानली जाते. तरीही त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सूर्या नदी चारोटी पुलावर हा अपघात झाला. वास्तविक सायरस मिस्त्री आपल्या तीन सहकाऱ्यांसह अहमदाबादहून मुंबईला येत होते. यादरम्यान पालघरजवळ झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तरीही सायरस मिस्त्री यांचा मृत्यू सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात झालेली कार सर्वात महागडी मर्सिडीज बेंझ आहे. ही कार सर्वात सुरक्षित मानली जाते. अपघात झाला त्यावेळी कारमधील एअर बॅग उघडली होती. मात्र, तरीही महागडी मर्सिडीज कार सायरस मिस्त्री यांचा जीव वाचवू शकली नाही, इतका भयंकर अपघात झाला आहे. हा अपघात कसा झाला? याचा तपास पोलीस करत आहे.

वाचा - Cyrus Mistry Death : सूर्या नदीच्या पूलावरुन जात असताना काळाचा घाला, देशाच्या मोठ्या उद्योगपतीचा नेमका अपघात कसा घडला?

मर्सिडीज-बेंझ कार किती सुरक्षित? मर्सिडीज-बेंझने वापरकर्त्यांना अतिरिक्त रस्ता सुरक्षा प्रदान करण्यासाठी कार-टू-एक्स फंक्शन अपग्रेड केले आहे आणि ते आता EQS मध्ये देखील उपलब्ध आहे. तुम्ही या सुविधेचा वापर करून ऑडिबल मॅसेजद्वारे ड्रायव्हरला खड्डे, स्पीड बंप यांसारख्या धोक्याच्या सूचना आधीच देऊन सावध करतात. जेव्हा चेसिस कंट्रोल युनिटला अशी परिस्थिती आढळते, तेव्हा कार-टू-एक्स कम्युनिकेशन सर्व्हिस सक्रिय होते, असे कंपनीने म्हटले आहे. त्यानंतर मोबाईल फोन नेटवर्क आणि पोझिशनल डेटा वापरून रिअल टाइममध्ये मर्सिडीज-बेंझ क्लाउडवर माहिती प्रसारित केली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात