मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भिवंडी : तलावात तरंगणारी कार पाहून नागरिक हादरले, Video होतोय व्हायरल 

भिवंडी : तलावात तरंगणारी कार पाहून नागरिक हादरले, Video होतोय व्हायरल 

बराच वेळ कार तलावात तरंगत होती. हे पाहून अनेकांना धक्काच बसला.

बराच वेळ कार तलावात तरंगत होती. हे पाहून अनेकांना धक्काच बसला.

बराच वेळ कार तलावात तरंगत होती. हे पाहून अनेकांना धक्काच बसला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

भिवंडी, 1 सप्टेंबर : भिवंडीतील दिवान शाह तलावात एक कार तरंगत असल्याचं स्थानिकांनी पाहताच खळबळ उडाली. बराच वेळ ही कार तलावात तरंगत होती. यानंतर परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. यानंतर परिसरात गर्दी जमा झाली. पाहता पाहता ही कार पाण्यात बुडाली. प्रशासनाला याबाबत सायंकाळी माहिती मिळाली. यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने टोइंग मशीनच्या साहाय्याने तलावातून कार बाहेर काढलीय.

भिवंडीतील दिवान शाह भावाच्या एका तलावाजवळ स्थानिक आपली गाडी पार्क करून कामासाठी निघून जातात. एका व्यक्तीने आजही तलावाजवळ आपली कार येथे पार्क केली होती. मात्र पार्किंगच्या जागेवर स्लोप असल्याकारणाने कार मागे मागे जात तलावात पडली. बराच वेळ कार तलावात तरंगत होती.

तलावात तरंगणारी कार पाहून आजूबाजूचे लोकही हैराण झाले. काही वेळानंतर कार पूर्णपणे तलावात बुडाली. यानंतर अधिकाऱ्यांनी टोइंग मशीनच्या साहाय्याने कारचा शोध सुरू केला. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर शेवटी कार बाहेर काढण्यात आली.

First published:

Tags: Live video, Mumbai