प्रशांत पांडे/मुंबई, 3 ऑक्टोबर : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने मुंबई सत्र न्यायालयात नवा खुलासा केला आहे. तिच्या या खुलाशाने सर्वांनाच धक्का बसला आहे. 2012 मध्ये शीना बोराची हत्या करण्यात आली होती. यानंतर 2015 मध्ये शीना बोराच्या हत्या प्रकरणात इंद्राणीला अटक करण्यात आली होती.
इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांकडून आज राहुल मुखर्जी याची उलट तपासणी घेता वेळी हा मोठा खुलासा करण्यात आला आहे. इंद्राणीचे वकील अॅड रणजीत सांगळे यांनी विचारले की, शीना तुझी चुलत बहीण आहे हे माहिती झाल्यानंतरही तिच्यासोबत शारीरिक संबंध का ठेवले? या बाबत नैतिक दृष्ट्या तुला काहीच वाटलं नाही का ?
यावर साक्षीदार राहुल मुखर्जीने सांगितलं की, इंद्राणी आणि माझे ब्लड रिलेशन नसल्यामुळे मी आणि शीना एकमेकांच्या संमतीने रिलेशनशिप सुरू ठेवली. मात्र 2015 पासून शीना ही माझी मुलगी नसून बहीण असल्याचा इंद्राणी मुखर्जी कडून दावा केला जात होता. आज अखेर इंद्राणीने शीना ही स्वतःची मुलगी असल्याचं कबुल केलं आहे.
राहुल मुखर्जीचं गुन्हेदारी कृत्य
राहुल मुखर्जी याने यापूर्वीही गुन्हेगारीचं कृत्य केल्याचं इंद्राणीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. राहुल मुखर्जीने 2010 मध्ये एका गर्भवती महिलेला बाइकने धडक दिली होती. यामुळे गर्भवती महिलेचा गर्भपात झाला होता. मात्र या प्रकरणात पोलिसात कोणतीही नोंद सापडली नाही. हे प्रकरण राहुलने पैसे देऊन दाबल्याचाही दावा करण्यात आला आहे. राहुलकडूम सोहल बुद्धा नावाच्या साक्षीदाराचं तोंड बंद करण्यासाठी 10 लाख रुपये दिले होते.
काय आहे प्रकरण?
इंद्राणी मुखर्जीची दोन लग्न झाली आहेत. शीना ही तिच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलही आहे. इंद्राणीने पीटर मुखर्जीसोबत दुसरं लग्न केलं होतं. दरम्यान शीना आणि पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीपासूनच मुलगा राहुल मुखर्जीसोबत तिचे प्रेमसंबंध सुरू होते. हे इंद्राणीला आवडत नव्हते. यातूनच तिने आपली लेक शीनाची हत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: High Court, Mumbai, Sheena murder case