19 ऑगस्ट : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही समर्थक केलंय.
हिंदू राष्ट्र ही शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांचीच भूमिका होती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मोहन भागवत यांनी दोनच दिवसांपूर्वी पुन्हा एकदा हिंदुस्थानातील नागरिक हिंदू आहेत, असं म्हटलं होतं. त्यावर बर्याच प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हे वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडलंय.
हिंदू राष्ट्र ही शिवसेनाप्रमखांचीच भूमिका आहे. त्यामुळे सरसंघचालकांच्या वक्तव्याचं समर्थन करतो. हे राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे, हे कुणी सांगण्याची गरज नाही. हे हिंदू राष्ट्रच आहे असंही उद्धव यांनी ठणकावून सांगितलं.
मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात भागवत यांनी, हिंदू धर्मामध्ये इतर धर्मांनाही समाविष्ट करून घेण्याची क्षमता आहे. हिंदुस्तान हे हिंदूंचं राष्ट्र तर हिंदूत्व ही आपल्या देशाची ओळख असल्याचंही भागवत म्हणाले होते. विशेष म्हणजे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर संघानेही आक्रमक होत हिंदूत्वाचा मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++