जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / थरांचा थरार अन् अवघी मुंबापुरी गोविंदामय

थरांचा थरार अन् अवघी मुंबापुरी गोविंदामय

थरांचा थरार अन् अवघी मुंबापुरी गोविंदामय

18 ऑगस्ट : गोविंदा रे गोपाळा…बोल बजरंग बली की जय…गो गो गोविंदा…डीजेच्या तालावर बेधुंद होतं गोविंदा आता खर्‍या अर्थाने आला आहे. अवघी मुंबापुरी गोविंदामय झाली असून ठिकठिकाणी थरांचा थरार पाहण्यास मिळत आहे. ठाणे,वरळी, घाटकोपरसह संपूर्ण मुंबईत गोविंदा थर रचत आहे. गोविंदाचा उत्साह वाढवण्यासाठी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींसह मराठी सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. कोर्टाची लढाई अशंत: जिंकल्यानंतर गोविंदाच्या उत्साहाला उधाण आलं आहे. जाहिरात यंदाचा दहीहंडीचा थर रंगला तो वादाने. बालगोविंदाच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता मुंबई हायकोर्टाने 12 वर्षाखालील गोविंदा बंदी घातली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

    mumbai dahi handi 2014 18 ऑगस्ट : गोविंदा रे गोपाळा…बोल बजरंग बली की जय…गो गो गोविंदा…डीजेच्या तालावर बेधुंद होतं गोविंदा आता खर्‍या अर्थाने आला आहे. अवघी मुंबापुरी गोविंदामय झाली असून ठिकठिकाणी थरांचा थरार पाहण्यास मिळत आहे. ठाणे,वरळी, घाटकोपरसह संपूर्ण मुंबईत गोविंदा थर रचत आहे. गोविंदाचा उत्साह वाढवण्यासाठी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींसह मराठी सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. कोर्टाची लढाई अशंत: जिंकल्यानंतर गोविंदाच्या उत्साहाला उधाण आलं आहे.

    जाहिरात

    यंदाचा दहीहंडीचा थर रंगला तो वादाने. बालगोविंदाच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता मुंबई हायकोर्टाने 12 वर्षाखालील गोविंदा बंदी घातली होती. पण बालगोविंदा जर नसला तर सलामी कशी देणार असा प्रश्न गोविंदापथकांसमोर उभा राहिली. परिणामी गोविंदांनी कोर्टाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत बालगोविंदाला थरावर चढवले. मात्र नवी मुंबई आणि जोगेश्वरीमध्ये दोन गोविंदाच्या मृत्यूच्या घटना घडल्यामुळे गोविंदापथकांच्या बालहट्टावर सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. हायकोर्टाने पुन्हा दखल घेत 18 वर्षाखालील मुलांना बंदी घातली आणि 20 फुटांपर्यंत थर लावण्यास निर्बंध घातले. पण कोर्टाच्या या निर्णयालाही गोविंदांनी जुमानलं नाही. आम्ही नेहमी सारखे थर लावणारच असा आक्रमक पवित्रा घेतला.

    ठाण्यातील संघर्ष दहीहंडीचे आयोजक आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रीम कोर्टात हायकोर्टाच्या या निर्णयाला आव्हान दिलं. सुप्रीम कोर्टाने गोविंदांना दिलासा देत थर लावण्यास परवानगी दिली पण 12 वर्षाखालील गोविंदांना बंदी घातली. सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलामुळे गोविंदापथकांनी एकच जल्लोष केला आणि दहीहंडीचे थर फोडण्यासाठी जय्यत तयारी केली. अखेर आज गोविंदांचा दिवस उजाडला. आज सकाळपासून हजारो गोविंदापथक ट्रक,बसने दहीहंडी फोडण्यासाठी निघाले आहे.

    जाहिरात

    मुंबई गल्लोगली छोट्यामोठ्या दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. तर लाखांच्या बक्षिसांची लयलूट करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठाणे, घाटकोपर, वरळी, टेंभीनाका, बोरिवली इथं भव्य दहीहंडी लावण्यात आल्या आहेत. ठाण्यात संघर्ष दहीहंडीचे आयोजक जितेंद्र आव्हाड यांनी यंदा 25 लाखांचे बक्षीस ठेवले आहे. तर त्याच पाठोपाठ घाटकोपरमध्ये मनसेचे आमदार राम कदम यांनीही लाखांचे बक्षीस ठेवून बक्षिसांच्या लोणीचे आव्हान दिले आहे. तर दादरमध्ये आयडियलची हंडी मात्र परंपरा जपणारी आहे. सकाळी लवकर ही हंडी फोडली गेलीये. आता दिवस जसा जसा संपत चाललाय तसा तसा गोविंदाचा जल्लोष आणखी द्विगुणा होत आहे. संध्याकाळी खर्‍याअर्थाने थरांचा थरार पाहण्यास मिळणार आहे.

    जाहिरात

    ================================================================================ दहीहंडीचे व्हिडिओ पाहण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा - http://www.ibnlokmat.tv/archives/category/video दहीहंडीचे फोटो पाहण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा -http://www.ibnlokmat.tv/archives/category/photo-gallery +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात