महाराष्ट्र : 73 कोटींच्या पाण्याची चोरी, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र : 73 कोटींच्या पाण्याची चोरी, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाण्याची चोरी झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी पोलिस चौकशी करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 17 ऑक्टोबर : चोर कशाचीही चोरी करू शकतात. काहीवेळी विचित्र चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. आताही देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अशीच घटना उघडकीस आली आहे. विहीर चोरीला गेली सिनेमानंतर अनेक जणांनी आपली विहिर चोरीला गेल्याच्या तक्रारी केल्या होत्या. पण आता पाण्याची चोरी झाल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली असून यामध्ये 73.18 कोटी रुपयांची चोरी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाण्याची चोरी तीसुद्धा थोडी थोडकी नाही तर तब्बल 73 कोटींची असल्याचं समजल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनाही धक्का बसला. अधिक चौकशी केली असता समजलं की, पाण्याची चोरी 11 वर्षांपासून केली जात होती. या 11 वर्षांत आरोपींनी 73 कोटी रुपयांचं पाणी चोरल्याचं समोर आलं आहे. आता पोलिस आरोपींचा शोध घेत असून प्रकरणाची चौकशी करत आहेत.

महाराष्ट्र सध्या दुष्काळाचा सामना करत आहे. इथं पाण्याची बचत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जमिनीखाली पाण्याची पातळी कमी झाल्यानं भीषण पाणीटंचाई आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

VIDEO : '... म्हणून शरद पवारांना ईडीची नोटीस', मुख्यमंत्री फडणवीस यांचा गौप्यस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 11:05 AM IST

ताज्या बातम्या