मुंबई, 16 जून : कोरोनामुळे फेरीवाले, शेतकरी, छोटे-मोठे व्यावसायिक, धंदेवाले यांनादेखील चांगलाच फटका बसला. अशाचप्रकारे कोरोनाचा फटका नाका कामगारांवरदेखील (Naka Workers Mumbai) झाला आहे. पूर्वीसारखं त्यांच्या हाताला काम मिळत नाही. त्यांच्यावर बहुतेकदा उपासमारी सहन करावी लागत आहे. त्यामुळे आज तरी काम मिळेल, आशाने मजूर अड्ड्यावर दिवसभर उभारलं तरी त्यांच्या हाताला काम मिळत नाही, अशी परिस्थिती सध्या मुंबईमधील मजुरांची झालेली आहे. (The workers in Mumbai are not getting work)
मुंबई शहरात दररोज अनेक लोक काम मिळेल, या आशेने मजूर अड्ड्यावर येतं असतात. रोजगाराची हमी देणारे शहर म्हणून मुंबईची ओळख असली, अनेकांना हाताला काम मिळावं म्हणून ताठकळत उभा राहावं लागतं आहे. काही छोटा-मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहे, पण मजुरांना मात्र कोरोनानंतर हाताला काम मिळायचं बंद झालेलं आहे. त्यामुळे दिवसभर मजूर अड्ड्यावर उभं राहुनही निशाराच या मजुरांच्या पदरी पडत आहे. कोरोनानंतर ही परिस्थिती जास्तच बिघडल्याचं चित्र आहे.
मुंबई शहरात बोरिवली, अंधेरी भागात नाक्यावर ही मंडळी मोठ्या प्रमाणात कामासाठी उभी राहतात. सकाळी 7 ते 11 यावळेत अनेक स्त्री- पुरुष नाक्यावर उभे राहून काम मिळेल, या आशेत असतात. मात्र, त्यांना आता पूर्वीप्रमाणे काम मिळत नसल्याने मोकळ्या हाताने घरी परतण्याशिवाय पर्याय उरत नाही. युपीचा मजूर विजय कुमार राठोड हा मुंबईला जॉब शोधण्यासाठी आला होता. कुठेही काम मिळत नसल्याने ते गेले अनेक महिने नाक्यावर काम मिळेल या आशेने उभा राहतो. तो सध्या अंधेरी येथील भागात भाड्याच्या खोलीत राहतो.
वाचा : Video: 60 व्या वर्षी एक मजूर बनला मॉडेल; जबरदस्त चेंजमुळं सोशल मीडियावर हवा
विजय कुमार म्हणाला की, "कोरोनाच्या काळात आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. सर्व काही बंद असल्याने कुठेही काम मिळत नव्हते. कसंतरी मी माझ्या घरी गेलो. मात्र, आता सर्व काही खुले झाल्याने मी परत एकदा मुंबईत नोकरी शोधण्यासाठी आलो. पण, शिक्षण नसल्याने कुठे काम मिळाले नाही. त्यामुळे मागील 4 ते 5 महिने मी नाक्यावर उभे राहून काम करतो. आठवड्यातील एक दिवस काम मिळते, तर 5 दिवस काम मिळत नाही अशी स्थिती आहे"
वाचा : इलेक्ट्रिक वाहने खरच पर्यावरणपूरक आहेत का? वाचा Electric Vehicle मागचं धक्कादायक सत्य
मुंबईमध्ये देशातील विविध भागातून हे मजूर येतं असतात. कोलकाता, दिल्ली, तामिळनाडू, बंगाल, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार राज्यांतून हे मजूर मुंबईसारख्या शहरात येतं असतात. नाक्यावर उभे राहून स्वतःच पोट भरत असतात. मात्र, पूर्वीसारखा व्यवसाय न राहिल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सकाळी 7 ते 11 यावेळेत हे कामगार नाक्यावर उभे राहतात. पण, कोरोनामुळे आता पूर्वीसारखी कामं मिळत नाहीत, अशी खंत मजूर अड्ड्यावरील मजूर बोलून दाखवत आहेत.
घराचं भाडंदेखील भरणं झालंय अवघड
आनंद शर्मा हे बिहारमधून स्वतःच पोट भरण्यासाठी मुंबईत आले. मात्र, पूर्वीसारखा व्यवसाय न राहिल्याने त्यांना स्वतःच कुटुंब चालवणंदेखील अवघड होत आहे. पैसे मिळत नसल्याने त्यांना स्वतःचा घराचं भाडंदेखील भरता येत नाही. आनंद म्हणाले की, "पूर्वीसारखा व्यवसाय राहिला नाही. कोरोनाकाळात तर आमचं सर्व काही गेलं. सर्व काही बंद असल्याने कामच मिळणं कठीण झालं. पूर्वी थोडे पैसे तरी मिळत होते. मात्र, आत ते मिळणंदेखील कठीण झालं आहे. मी 4 हजार भाडं देऊन राहतो. मात्र, पैसे नसल्याने घरून मागवून घेत आहे."
रिकाम्या हातानेच घरी परतावे लागते
कित्येक मालक हे मजूर हवा आहे म्हणून येतात. कंत्राट लोकांशी सौदा करतात, काहींना काम मिळते तर काहींना मिळत नाही. अनेकाना दररोज 3 ते 4 तास ताटकळत उभे राहावे लागते. काम मिळाले नाही तर रिकाम्या हाताने घरी परतावे लागते. विशाल चव्हाण हे बोरिवलीमध्ये झोपडपट्टीत राहतात. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्यानं कुठेतरी काम करुन घर भागवावे लागते. ते म्हणतात की, "दररोज आम्हाला 4 तास ताटकळत बसावे लागते. कधी काम मिळते तर कधी नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.