मुंबई, 18 जून : जगभरात बुद्धांचं महत्व अनन्यसाधारण आहे. त्यांचे विचार, त्यांचे आचार आणि त्यांची वाणी माणसाच्या आयुष्याला दिशादर्शक ठरते. पण, हे सगळं त्यांना एका भाषेतून (Pali Language) मांडलं. ती भाषा म्हणजे 'पाली'. जर बुद्धांना समजून घ्यायचा असेल तर अभ्यासकाला पाली भाषा यावी लागते. विद्यार्थ्यांना पाली भाषा आली तर उत्तमच. दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच लागला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने 10 वी आणि 12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पाली भाषेतील विविध सर्टिफिकेट (Pali Language in University of Mumbai) कोर्सेस सुरू केलेले आहेत. त्याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया...
मुंबई विद्यापीठातील पाली भाषेतील प्रा. मेघा तायडे सांगतात की, "पाली ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. या भाषेचे अध्ययन आणि अभ्यास भारतातच नाही तर संपूर्ण जगात होत आहे. पाली विभागात पालीचे अनेक कोर्सेस आहेत. जसे एम. ए (M.A) पाली, पिजीएडी (PGAD) पाली, 5 Years BA/MA integrated Course in Pali, Ph.D Pali, तसेच 7 एक वर्षीय कोर्ससुद्धा आहेत. पाली विभागात सर्व शिक्षक हे नेट (Net qualified) आहेत. तसेस पाली विभागातील शिक्षक व विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध प्रबंधसुद्धा सादर झाले आहेत. OCBS (Oxford Centre of Buddhist Studies, London) कडून विद्यार्थ्यांना पाली व्याकारणाचे विशेष प्रशिक्षण दिले जाते."
पाली भाषा आणि साहित्य : या अभ्यासक्रमाचा कालावधी वर्षभराचा आहे. 1000 रूपये फी आहे. तर नोंदणी करण्यासाठी 40 द्यावे लागतात. शिकण्याची वेळ ही शनिवारी 2.30 ते 6.30 आणि रविवारी 2.30 ते 6.30 (सायंकाळी) असे आठवड्यातून 2 दिवस याचे वर्ग घेतले जाणार आहेत. परिक्षेचं स्वरूप लेखी असून 80 गुणांचा पेपर असेल आणि 20 गुण हे स्वाध्याय गुण म्हणून दिले जाणार आहेत. परीक्षेत 'पाली साहित्य' आणि 'पाली व्याकरण', असे 2 पेपर द्यावे लागतात.
वाचा : MH BOARD SSC RESULT: निकाल तर लागला! पण आता पुढे काय? ‘हे’ आहेत 10वी नंतरचे बेस्ट करिअर ऑप्शन्स
पाली भाषा आणि बुद्ध संस्कृती : या अभ्यासक्रमाचा कालावधी वर्षभराचा आहे. 1500 रूपये फी आहे. शिकण्याची वेळ ही मंगळवारी सायंकाळी 6 ते 8 असून आठवड्यातून एक दिवस याचे वर्ग घेतले जाणार आहेत. परिक्षेचं स्वरूप लेखी असून 80 गुणांचा पेपर असेल आणि 20 गुण हे स्वाध्याय गुण म्हणून दिले जाणार आहेत. परीक्षेत 'पाली भाषा' आणि 'बौद्ध संस्कृती', असे 2 पेपर द्यावे लागतात.
पाली भाषा आणि बुद्धची शिकवण : या अभ्यासक्रमाचा कालावधी वर्षभराचा आहे. 1500 रूपये फी आहे. शिकण्याची वेळ ही मंगळवारी सायंकाळी 6 ते 8 आणि रविवारी 4.30 ते 6.30 (सायंकाळी) असे आठवड्यातून 2 दिवस याचे वर्ग घेतले जाणार आहेत. परिक्षेचं स्वरूप लेखी असून 80 गुणांचा पेपर असेल आणि 20 गुण हे स्वाध्याय गुण म्हणून दिले जाणार आहेत. परीक्षेत 'पाली भाषा आणि साहित्य' आणि 'पाली भाषा आणि बुद्ध शिकवण', असे 2 पेपर द्यावे लागतात.
वाचा : Beed: करिअर अलर्ट! विद्यार्थ्यांनो, दहावी-बारावीनंतर ‘या’ कोर्समध्ये आहेत करिअरच्या मोठ्या संधी
पाली भाषा अनी बौद्ध अध्ययन : या अभ्यासक्रमाचा कालावधी वर्षभराचा आहे. 2000 रूपये फी आहे. शिकण्याची वेळ ही मंगळवारी सायंकाळी 6 ते 8 आणि रविवारी 4.30 ते 6.30 (सायंकाळी) असे आठवड्यातून 2 दिवस याचे वर्ग घेतले जाणार आहेत. परिक्षेचं स्वरूप लेखी असून 80 गुणांचा पेपर असेल आणि 20 गुण हे स्वाध्याय गुण म्हणून दिले जाणार आहेत. परीक्षेत 'बुद्ध धर्माचा इतिहास' आणि 'पाली साहित्याचा बुद्ध धम्म', असे 2 पेपर द्यावे लागतात.
पाली भाषा अणि बौद्ध कला : या अभ्यासक्रमाचा कालावधी वर्षभराचा आहे. 3000 रूपये फी आहे. शिकण्याची वेळ ही गुरूवारी सायंकाळी 6 ते 8 आणि रविवारी 4.30 ते 6 (सायंकाळी) असे आठवड्यातून 2 दिवस याचे वर्ग घेतले जाणार आहेत. परिक्षेचं स्वरूप लेखी असून 60 गुणांचा पेपर असेल आणि 40 गुण हे स्टुडिओतील गुण म्हणून दिले जाणार आहेत. या कोर्ससाठी टीडी, जिडी आर्ट, बीएफए पास असणं आवश्यक आहे. या कोर्सच्या परीक्षेत 1) बौद्ध सौंदर्य शास्त्रपेपर 2) बौद्ध कलेचा इतिहासपेपर 3) बौद्ध अणि बोधीसत्वपेपर 4) पालिटिल निवडक सुट्ट अणि गाथा, असे 4 पेपर द्यावे लागतात.
वाचा : Career Tips: येत्या काळाची गरज आहे Ethical Hacking; करिअर करण्यासाठी ‘हे’ स्किल्स असतात IMP
पारियत्ती अणि पटीपत्ती : या अभ्यासक्रमाचा कालावधी वर्षभराचा आहे. 2000 रूपये फी आहे. शिकण्याची वेळ ही शनिवारी सायंकाळी 4.30 ते 6.30 आणि रविवारी 4.30 ते 6.30 (सायंकाळी) असे आठवड्यातून 2 दिवस याचे वर्ग घेतले जाणार आहेत. परिक्षेचं स्वरूप लेखी असून 100 गुणांचा पेपर असेल आणि 25 गुण हे स्वाध्याय गुण म्हणून दिले जाणार आहेत. परीक्षेत 'थेरवादाचे सिद्धांत' आणि 'थेरवदाणुसर आचरण', असे 2 पेपर द्यावे लागतात.
बौद्ध अध्ययन अणि विपश्यना : या अभ्यासक्रमाचा कालावधी वर्षभराचा आहे. 2000 रूपये फी आहे. शिकण्याची वेळ ही शनिवारी सायंकाळी 4.30 ते 6.30 आणि रविवारी 4.30 ते 6.30 (सायंकाळी) असे आठवड्यातून 2 दिवस याचे वर्ग घेतले जाणार आहेत. परिक्षेचं स्वरूप लेखी असून 100 गुणांचा पेपर असणार आहे. परीक्षेत 'पाली भाषा साहित्याचा अभ्यास' आणि 'पाली साहित्य अणि विपश्यना सिद्धांत', असे 2 पेपर द्यावे लागतात.
गुगल मॅपवरून साभार...
वरील कोर्सेससाठी प्रवेश कसे घ्याल?
सर्व कोर्सेस 1 वर्षाचे असून दहावी-बारावी नंतर हे कोर्सेस करता येऊ शकतात. पुढील काही दिवसांतच मुंबई विद्यापीठाकडून सूचना जारी केल्या जातील. प्रवेश ऑनलाईनच असून https://mu.ac.in/department-of-pali या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येईल. या कोर्सेसच्या चौकशीसाठी 93244 59041 क्रमांकावर संपर्क साधू शकता. departmentofpali@gmail.com या ई-मेलवरील संपर्क करू शकता. सांताक्रुझ स्टेशनवरून काही अंतरावरच मुंबई विद्यापीठात तुम्ही जाऊ शकता. हे कोर्स केले तर, विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी जाॅबच्या संधी आहेत. प्रसार माध्यमं, भाषा क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात आणि पर्यटन क्षेत्रात जाॅबच्या संधी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Education, Job, Job alert, जॉब, महाराष्ट्र