मुंबई, 14 जून : पावसाळा आला की, बाजारात रेनकोट, छत्री, पावसाळी बूट बाजारात दाखल होतात. मुंबईच्या बाजारात (Mumbai Market) अशा वस्तुंची रेलचेल पहायला मिळत आहे. विविध प्रकारचे डिझाईन केलेले शूज बाजारात आलेले आहेत. हे स्टायलिश शूट खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी उसळत आहे. अंधेरी, बोरिवली बाजारात हे रेनी शूज (Renee shoes price) विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत.
वाचा : मुंबईची प्रसिद्ध ‘राणीची बाग’ पहिलेय? इथं हत्ती, वाघच नाही तर पेंग्विन्सही पहायला मिळतात, पहा VIDEO
दादर, अंधेरी या भागात अनेक व्यवसायिकांनी आपले दुकान मोठ्या प्रमाणात थाटले आहे. या शूजमध्ये विविध रंगाचे, विविध आकाराचे आणि विविध डिझायनचे शूज आलेले दिसत आहेत. यासंदर्भात विक्रेते कौशिक मिश्रा म्हणतात की, "पावसाळा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे बाजारात रेनी शूज विक्रीसाठी आणलेले आहेत. ग्राहकांचाही पावसाळ्याच्या दिवसांत शूज खरेदीसाठी मोठी गर्दी होते. तसेच पावसाळी चप्पल, सॅन्डल्सही विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत." कौशिक मिश्रा यांनी पावसाळ्या सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळी चपलांची दुकान थाटले आहे.
साधारणपणे या रेनी शूजच्या किमती 200 रुपये इतके आहेत. विजय साहानी यांनीदेखील मागील काही दिवसांपूर्वीच पावसाचा अंदाज घेऊन रेनी शूजचा व्यवसाय थाटला आहे. आमच्या येथे विविध प्रकारची शूज विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये 150 ते 200 रुपयांपासून शूजच्या किमती आहे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monsoon