मुंबई, 15 जून : 100 वर्षांपुर्वीची जुनं मंदिर म्हणून दादरच्या कबुतर खान्याजवळ असणाऱ्या हनुमान मंदिराकडे (Famous Hanuman Temple in Dadar) पाहिले जातं. विशेष हे की, या मंदिराला सर्वधर्मसमभावाचं प्रतिक मानलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक या मंदिरात हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी येतात. दादरमधील प्रसिद्ध असं मंदिर (Hanuman Temple) आहे. त्या मंदिराविषयी थोडक्यात जाणून घेऊया...
या मंदिराची निर्मिती कशी झाली, याचं ठोस प्रमाण सापडत नाही. मात्र, जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार प्रबोधनकार ठाकरे यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे. 1920 साली मारुतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी मंदिर स्थापन करण्यात आलं. मंदिराच्या समोर मस्जिद आहे. मंदिराच्या मागील भागात क्रॉस आहे. अनेक लोक याला सर्वधर्मसमभावाचं प्रतीक मानतात. गेले अनेक वर्षे भाविक दर्शनासाठी मंदिरात गर्दी करत असतात. शुक्रवार आणि शनिवरी भाविकांची प्रचंड गर्दी करत असते. मंदिरात एकूण अनेक देवतांच्या मुर्ती आहेत. मंदिरात सकाळी आणि संध्याकाळी नित्यनियमाने पूजा केली जाते.
मंदिराचे व्यवस्थापक अरुण वस्त म्हणाले की, "हे मंदिर 100 वर्षं जुनं आहे. बुजुर्ग माणसांच्या म्हणण्यानुसार हे मंंदिर प्रबोधनकार ठाकरे यांनी 1920 साली स्थापन केलं. मात्र, याबद्दल कसालाही पुरावा आपल्याकडे सापडत नाही. मंदिराच्या समोर मस्जिद आहे, तर मागील बाजूस ख्रिस्त धर्माचा क्रॉस आहे. त्यामुळे हे मंदिर सर्वधर्म समभावाचं प्रतिक मानलं जातं. दररोज मंदिरामध्ये पूजा होते. शनिवारी भाविकांची मोठी गर्दी करतात. "हनुमानाच्या भक्त अर्चना सोमन म्हणतात की, "मागील अनेक वर्षं या मंदिरात येते. हनुमानावर माझा खूप विश्वास आहे. कारण, तो नवसाला पावतो. या मंदिरात आल्यानंतर मन शांत आणि समाधानी होतं."
गुगल मॅपवरून साभार...
कसे पोहोचाल या मंदिरापर्यंत?
दादरचे हे प्रसिद्ध मंदिर 2R9V+4G8, दादर स्टेशनजवळ, पादचारी ओव्हरपास, स्वामी ज्ञान जीवनदास मार्ग, लोकमान्य टिळक कॉलनी, दादर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400014 या पत्त्यावर आहे. सीएसएमटी स्टेशनपासून 9 किलोमीटर अंतरावर हे मंदिर असून तिथे जाण्यासाठी साधारण 21 मिनिट लागतात. पुण्याहून निघत असाल तर 159 किलोमीटर अंतर असून तिथे पोहोचायला साडेतीन तास लागतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.