मुंबई, 21 जून : नूर मेहर स्कूलमधील (Malad Madrasa) 22 हाफिजांनी दहावीच्या परीक्षेमध्ये भरघोस यश संपादित केलं आहे. 22 हाफिजांपैकी 14 हाफिजांनी दहावीच्या परीक्षेत 75 टक्क्यांच्या पुढे, तर 8 हाफिजांनी 60 टक्केच्या पुढे गुण मिळवले आहेत. आत्तापर्यंत 97 विद्यार्थी शालेय शिक्षणाबरोबरच हाफिजमध्येदेखील उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे दहावीच्या परीक्षेबरोबर या हाफिजांनी धार्मिक शिक्षणातही बाजी मारली आहे. (22 Hafeez from Malad Madrasa passed 10th exam)
या शाळेची सुरुवात 2006 साली सय्यद अली हुसैन यांनी केली. या शाळेतील शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे. समाज कल्याण करत असताना समाजकारणाचा वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे. या शाळेत शालेय शिक्षणाबरोबरच धार्मिक शिक्षणदेखील देऊन एक नवा समाज घडविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. दहावीच्या परीक्षेत 83 टक्के गुण मिळवणारे हाफिज अबू तल्हा म्हणतात की, "दहावीच्या परीक्षेत 83 टक्के गुण मिळाल्यामुले मी आणि माझ्या घरचे व शिक्षकही आनंदी आनंदी आहे. अपेक्षापेक्षा जास्त गुण मला परीक्षेत मिळाले आहेत."
दहावीच्या परीक्षेत सगळ्यांना चांगले गुण मिळाल्याचं श्रेय विद्यार्थी आपल्या शिक्षकांना देतात. या स्कूलमध्ये वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे शिक्षक आहेत. तसेच हे सर्व शिक्षक हे खूप शिकलेले अणि अनुभवी आहेत. हाफिज दिलशान शकील यांनीदेखील दहावीच्या परीक्षेत यश संपादित केले आहे. ते त्याचं श्रेय हे त्यांच्या शिक्षकांना देतात. हाफिज दिशान शकील म्हणाले की, "आम्ही सर्वांनी मिळून खूप अभ्यास केला. धार्मिक शिक्षणाबरोरच दहावीच्या अभ्यासाला जोर लावला होता. त्यामुळे चांगले मार्क मिळवले. याचं संपूर्ण श्रेय आमच्या शिक्षकांचं आहे. या शिक्षकांनी आम्हाला घडवलं अणि इथपर्यंत येण्यास मदत केली."
भारताच राष्ट्रीय गीत गाऊन शाळेला सुरुवात होते. सकाळी शालेय शिक्षण दिलं जातं, तर दुपारी धार्मिक शिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्याना त्यांच्या शालेय शिक्षणाबरोबरच धार्मिक शिक्षणाची गोडी लागावी तसेच चांगल्या समजाची निर्मिती व्हावी हा एकमेव उद्देश येथील शिक्षकांचा आहे. अनेक विद्यार्थी दहावी पास झाल्यानंतर आनंदी आहेत, तसेच अनेक स्वप्नं घेऊन पुढचा प्रवास करणार आहेत. हाफिज हुजेईफा म्हणाले की, "मला दहावीच्या परीक्षेत 80 तक्के गुण मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. तसेच मला पुढे विज्ञातून शिकून सॉफ्टवेअर इंजिनीयर बनायचं आहे."
शाळेचे प्राचार्य काय म्हणतात?
शाळेचे प्राचार्य मिस. शाजिया शेख म्हणाल्या की, "जे यश हाफिजांनी मिळवलं आहे, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. 22 हाफिज यांनी दहावीच्या परीक्षेत यश मिळवलं आहे. यामधे 14 हाफिज हे डिस्टिंक्शनमध्ये आले असून 8 विद्यार्थी हे 60 टक्के क्या वर मार्क्स मिळवले आहेत. ज्यांनी हे स्कूल उभं केल ते सय्यद भाई यांच्या कार्यामुळे शाळेला एक नव रूप मिळालं. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी शालेय शिक्षण तर जीवनाचा मार्ग सापडण्यासाठी धार्मिक शिक्षण दोन्हीही आवश्यक आहे. या दोनही शिक्षणाची गरज ओळखून सय्यद भाई यांनी शाळेला एक नव रूप दिलं आहे. तसेच कॉम्प्युटरची गरज ओळखून शाळेमध्ये प्रशस्त अशी कॉम्प्युटर लॅबदेखील आहे."
कुठे आहे नूर मेहर स्कूल?
नुर मेहर हाऊस , बंगलो नंबर 2 म्हाडा समता कॉम्प्लेक्स, आर एस सी 20, आकाशवाणी ग्राउंड जवळ, मालवणी, मालाड (W) मुम्बई 400095 हा या स्कूलचा पत्ता आहे. तर, 9967759266 किंवा 28810448 क्रमांकावरही संपर्क करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Education, Maharashtra News, Ssc board