मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /समीर वानखेडेंची 9 तास चौकशी, कोपरी पोलिसांनी नोंदवला जबाब; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

समीर वानखेडेंची 9 तास चौकशी, कोपरी पोलिसांनी नोंदवला जबाब; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

रात्री 8.15 च्या सुमारास ते पोलीस ठाण्यातून बाहेर आले आणि तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचा दावा केला.

रात्री 8.15 च्या सुमारास ते पोलीस ठाण्यातून बाहेर आले आणि तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचा दावा केला.

रात्री 8.15 च्या सुमारास ते पोलीस ठाण्यातून बाहेर आले आणि तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचा दावा केला.

ठाणे, 24 फेब्रुवारी: मुंबई एनसीबीचे (Former Mumbai NCB zonal director) माजी झोनल संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी बुधवारी कोपरी पोलीस स्टेशनमध्ये (Kopari police station) हजेरी लावली. यावेळी कोपरी पोलिसांनी त्यांची सुमारे नऊ तास चौकशी केली. रात्री 8.15 च्या सुमारास ते पोलीस ठाण्यातून बाहेर आले आणि तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचा दावा केला. दारूचा परवाना घेताना बनावट माहिती देणं आणि जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केल्याप्रकरणी ते पोलीस ठाण्यात पोहोचले होते.

बुधवारी सकाळी 11.30 वाजता समीर वानखेडे ठाण्यातील कोपरी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर ते पोलीस स्टेशनमधून बाहेर आले. खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळवला असल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर लावण्यात आला आहे. त्यासाठी ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. कोपरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, न्यायालयाच्या आदेशानुसार वानखेडे पोलीस स्टेशनमध्ये आले होते आणि आम्ही त्यांचे तपशीलवार जबाब नोंदवलाआहे. चौकशी सुरू आहे आणि गरज पडल्यास आम्ही त्यांना पुन्हा बोलावू.

कोणत्याही क्षणी युद्ध होणार?, युक्रेनमध्ये आणीबाणी जाहीर 

हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, वानखेडे म्हणाले की, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं या प्रकरणावर किंवा नोंदवलेल्या जबाबावर मी भाष्य करू शकत नाही. मात्र पोलीस त्यांचे काम करत असून त्यांनी या प्रकरणी मला जेव्हाही बोलावलं तेव्हा मी त्यांना सहकार्य करेन. राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या ईडीनं केलेल्या अटकेवर त्यांनी कोणतेही प्रश्न विचारण्यास नकार दिला.

काय आहे नेमकं प्रकरण?

समीर वानखेडे यांच्यावर खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळवला असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच समीर वानखेडे यांच्या बारचा परवाना रद्द केला होता. समीर वानखेडे यांच्याविरोधात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी तक्रार दाखल केली आहे. नवी मुंबई वाशी येथून गुन्हा वर्ग केल्या नंतर कोपरी पोलीस ठाण्यात कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

गोगावले यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की, समीर वानखेडे यांनी खोटी माहिती दिली आणि खोट्या माहितीच्या आधारे मद्य विक्रीचा परवाना मिळवला. समीर वानखेडे यांच्या नावावर नवी मुंबईतल्या वाशी येथे एक बार आहे. उत्पादन शुल्क विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या बारसाठी 27 ऑक्टोबर 1997 रोजी परवाना दिला होता. या बारचे लायसन 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे. यावरुनच नवाब मलिकांनी वानखेडेंवर निशाणा साधला होता. हे बार आणि रेस्टॉरंट आहे. वयाच्या 17व्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बाजवल्यानंतर कारवाई केली होती. वाशी येथील सतगुरु हॉटेल्स च्या लायसन्स मध्ये वयाचा पुरावा नसल्याने समीर वानखडे काही त्रुटी आढळल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

IPL 2022 : पंजाब किंग्जचा कॅप्टन ठरला, 'या' खेळाडूच्या नावावर होणार शिक्कामोर्तब

त्यामुळे या ठिकाणी परदेशी बनावटीची तसेच IMFL (भारतीय बनावटीची विदेशी मद्य) विक्री करण्याची परवानगी दिली आहे. मात्र एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती देताना समीर वानखेडेंनी म्हटलं होतं की, हॉटेलचा परवाना आपल्या नावे असला तरी 2006 मध्ये भारतीय महसूल सेवेत दाखल होताच पॉवर ऑफ अॅटर्नी वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावे केला आहे.

First published:
top videos

    Tags: NCB