मुंबई, 10 जून : मुंबईची लोकल (Mumbai Local Railway) जगप्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी असणारी प्रवाशांची गर्दी आणि मुंबईचा सततचा असणारे वेग पाहून बऱ्याच वेळेला आश्चर्य वाटतं. अशा लोकलमध्ये अवलिया आनंद भावे भेटले. यांना अवलिया का म्हटलं तर, आनंद भावे नोकरीनिमित्त अंधेरी ते चर्चेगेट असा दररोज लोकलचा प्रवास करतात. त्या प्रवासादरम्यान मिळणारा वेळ तो कारणी लागावा आणि थोडासा विरंगुळा व्हावा, यातून त्यांनी लोकलमध्ये चित्रं काढण्यास सुरुवात केली, इतकंच नाही तर ते नैसर्गिक रंग बनविता, कागदांपासून टोप्या तयार करतात. आणि हे सगळं ते आपली सरकारी नोकरी सांभाळत करतात. (Unique painter from Mumbai local)
आनंद भावे लोकलचा प्रवास करत असतात, दरम्यान ते अनेकदा सहप्रवाशांची स्केचेस काढत असतात. मागील अनेक वर्षे ते हा छंद जोपासत आहेत. या प्रवासात त्यांना अनेक वेगवेगळे अनुभव आले आहेत. त्यातला एक अनुभव शेअर करताना भावे सांगतात की, "एकदा केरळ होऊन आलेली ट्रेन कोकणातून मुंबईत येण्यासाठी पकडली. ट्रेन बरीच भरलेली होती, तरीही चित्र काढण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. म्हणून फुटबॉर्डवर उभं राहून ,पाठ टेकून चित्र काढायला सुरुवात केली. याची बातमी डब्यामध्ये पसरताच सगळे गोळा होऊ लागले व त्यांना बसायला जागा देऊन चित्र काढायला सांगितले. मग, चित्र काढत, गप्पा मारत , केरळी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत त्यांचा हा प्रवास अगदी सुखद पार पडला."
वाचा : दररोज फक्त गहू आणि ज्वारीचेच पीठ नको; निरोगी आरोग्यासाठी या 5 पिठांचाही करा वापर
आनंद भावे यांना प्रत्येक वेळी चांगलेच अनुभव आलेत असं नाही, तर काही वाईट अनुभवदेखील आले आहेत. ते भावे सांगतात की, "लोकलमध्ये एकदा चित्र काढत असताना, ज्या व्यक्तीचे चित्र होते, त्या व्यक्तीच्या ते लक्षात आलं. ती व्यक्ती समोर येऊन ते चित्र खेचून घेतले. तसेच ते चित्र फाडून टाकले. त्या व्यक्तीला आपले चित्र काढलं जाणं हे अपमानास्पद वाटलं होतं", असा अनुभव भावेंनी व्यक्त शेअर केले.
वाचा : Healthy Heart: हृदयासाठी सकस आहाराची गरज होईल सहज पूर्ण; ही 5 प्रकारची ड्रायफ्रुट्स आजपासूनच खा
"एखादं चित्र काढताना काटेकोरपणे, तसंच्या तसं चित्र नाही जमलं तरी चालेल. परंतु, त्या व्यक्तीचा, वस्तूचा 'एसेन्स' चित्रातून यायला हवा. आमचे गुरू सांगायचे की, चौकोनी अॅप्पल काढलं तरी चालेल. पण, त्यात अॅप्पलनेस यायला हवा. मला वेगवेगळ्या छंदांविषयीसुद्धा लोकांशी बोलायला, जाणून घ्यायला आवडतं. असं करण्यानं 2 व्यक्तींमधील संवाद छान होतो. यासाठी आम्ही 'छंदोत्सव' हा ग्रुपही तयार केला आहे. तिथे प्रत्येकाला एक वेगळा छंद आहे आणि त्या संदर्भात ते सगळे मिळून वेगवेगळे उपक्रम करत असतात", अशी माहिती आनंद भावे यांनी सांगितली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.