मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पहिल्यांदाच BEST चे सारथ्य महिलांच्या हाती, 42 वर्षीय महिला बनली बेस्ट बसचालक

पहिल्यांदाच BEST चे सारथ्य महिलांच्या हाती, 42 वर्षीय महिला बनली बेस्ट बसचालक

X
लक्ष्मी

लक्ष्मी यांना आधीपासूनच गाड्या चालवण्याची आवड होती. पहिल्या रिक्षा चालक (Rikshaw Driver) म्हणून ही त्यांनी कामगिरी केली आहे. त्यांनी 25 ते 30 महिलांना रिक्षा चालवण्यासाठी ही प्रशिक्षित केले आहे.

लक्ष्मी यांना आधीपासूनच गाड्या चालवण्याची आवड होती. पहिल्या रिक्षा चालक (Rikshaw Driver) म्हणून ही त्यांनी कामगिरी केली आहे. त्यांनी 25 ते 30 महिलांना रिक्षा चालवण्यासाठी ही प्रशिक्षित केले आहे.

    मुंबई, 27 मे : पहिल्यांदाच बेस्टचे सारथ्य (BEST Driver) महिलांच्या हाती आले आहे. लक्ष्मी जाधव या 42 वर्षीय महिला आता मुंबईच्या बेस्ट सेवेत चालक (Woman BEST Bus Driver) बनून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहेत. लक्ष्मी यांना आधीपासूनच गाड्या चालवण्याची आवड होती. पहिल्या रिक्षा चालक (Rikshaw Driver) म्हणूनही त्यांनी कामगिरी केली आहे. त्यांनी 25 ते 30 महिलांना रिक्षा चालवण्यासाठीही प्रशिक्षित केले आहे. आता त्या बेस्ट सेवेत महिला चालक म्हणून रुजू होत आहेत. कुटुंबीयांचा त्यांच्या कामाला पाठिंबा असल्याचे त्या आवर्जून सांगतात. यासोबतच इतर ही महिलांनी या क्षेत्रात येण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे.

    First published:
    top videos

      Tags: Mumbai, Woman Driver