जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पालकांनो लहानग्यांकडे लक्ष द्या! मुंबईजवळील शहरात 3 वर्षाची मुलगी खेळण्यासाठी घराबाहेर पडली आणि....

पालकांनो लहानग्यांकडे लक्ष द्या! मुंबईजवळील शहरात 3 वर्षाची मुलगी खेळण्यासाठी घराबाहेर पडली आणि....

पालकांनो लहानग्यांकडे लक्ष द्या! मुंबईजवळील शहरात 3 वर्षाची मुलगी खेळण्यासाठी घराबाहेर पडली आणि....

थोडंतरी दुर्लक्ष झालं तर लहानग्यांची आवडती गोष्ट त्यांच्या जीवावरही बेतू शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

विरार, 31 ऑगस्ट : पावसाळा आला की मनसोक्त भिजून पाण्यात खेळण्यासाठी लहान मुलं नेहमीच उत्सुक असतात. मात्र अशावेळी त्यांच्याकडे थोडंतरी दुर्लक्ष झालं तर त्यांची आवडती गोष्ट त्यांच्या जीवावरही बेतू शकते. याचाच प्रत्यय विरार शहरात आला आहे. विरार पूर्व कणेर परिसरात एका गॅरेजवर गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून 3 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. विरारमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे. विरार पूर्वमध्ये बिपीन राऊत यांचं गॅरेज असलेल्या भागातही पाणी साचलेलं होतं. अशातच तिथं काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाची 3 वर्षीय आराध्य ही नात खेळता खेळता गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्याजवळ गेली. मात्र या खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने आराध्या त्यामध्ये बुडाली. खड्ड्यात पडलेल्या आराध्याने जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केली. मात्र आसपास कोणीच नसल्याने तिला मदत पोहोचू शकली नाही. घरात बऱ्याच काळ आराध्या नजरेस न पडल्याने तिच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा गॅरेजवरील रॅम्पच्या खड्ड्यात ती आढळून आली. तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. दरम्यान, विरार पोलीस स्थानकात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात