राज्यात गेल्या पाच महिन्यात दीड हजार लाख लीटर बिअरची विक्री झाली आहे. यात सर्वाधिक विक्री मे महिन्यात झाली असून तब्बल 406 लाख लीटर बिअर विकली गेली. यात मुंबई उपनगरात 53.46 लाख लीटर तर मुंबईत 17.61लाख लीटर बिअरची विक्री झाली.
जानेवारीच्या तुलनेत मे महिन्यात जवळपास दुप्पट बिअर विकण्यात आलीय. जानेवारी महिन्यात एकूण 221.28 लाख लिटर बिअर विक्री झाली त्यापैकी 35.99 लाख लीटर मुंबई उपनगरात तर 12.58 लाख लीटर बिअर मुंबई शहरात रिचवली गेली.
फेब्रुवारीमध्ये 242.30 लाख लिटर बिअरची विक्री झाल्याची आकडेवारी असून त्यापैकी 38.13 लाख लीटर मुंबई उपनगरात तर 12.96 लाख लीटर मुंबई शहरात विक्री झाली.
मार्च महिन्यात मुंबई शहरात 16.15 लाख लीटर आणि मुंबई उपनगरात 46.65 लाख लीटर बिअरची विक्री झाली. महिन्यात एकूण बिअरची विक्री ही 321.97 लाख लीटर इतकी होती.
एप्रिलमध्ये 344.09 लाख लीटर इतक्या बिअरची विक्री झाली. यामध्ये मुंबई उपनगरात 49.51 लाख लीटर तर मुंबई शहरात 16.64 लाख लीटर बिअर रिचवली गेली.