राज ठाकरे म्हणाले पक्षातच आहे गद्दार, 2 दिवसांत नावं समोर आणून करणार हकालपट्टी

राज ठाकरे म्हणाले पक्षातच आहे गद्दार, 2 दिवसांत नावं समोर आणून करणार हकालपट्टी

'आपल्याला जोरात काम करायचं आहे. पण काही लोक चुकीच्या बातम्या देतात. आपलेच कार्यकर्ते गद्दार आहेत. त्यांची नावं मला समजली असून मी त्यांना पक्षातून हद्दपार करणार'

  • Share this:

औरंगाबाद, 15 फेब्रुवारी : आपल्याच पक्षात काही लोक गद्दार आहेत. मीडियामध्ये चुकीच्या बातम्या देतात. या गद्दारांची नावं मला कळली असून त्यांची मी पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहे. सध्या राज ठाकरे आणि मनसे पक्षाच्या उभारणीसाठी मैदानात उतरले आहेत. औरंगाबादच्या दौऱ्यावेळी राज ठाकरे कार्यकर्त्यांशी बोलत होते.

'मी पक्षाच्या बैठकीसाठी आलो आहे. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. आपल्याला जोरात काम करायचं आहे. पण काही लोक चुकीच्या बातम्या देतात. आपलेच कार्यकर्ते गद्दार आहेत. त्यांची नावं मला समजली असून मी त्यांना पक्षातून हद्दपार करणार' असल्याचं राज ठाकरे म्हणाले. 'गद्दारपणा करणाऱ्यांना पक्षात जागा नाही त्यांची हकालपट्टी मी करणार आहे. 2 दिवसात त्यांना पक्षातून हकालणार आहे' अशा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

'बांगलादेशी घुसखोरांसाठी मी आंदोलन केलं. मात्र आता अफगाणी घुसखोर सापडले आहेत. परिस्थिती गंभीर आहे.  मी 15 दिवसांनी पुन्हा येईन तेव्हा सविस्तर बोलेल. आता मला जाण्याची रजा द्यावी' असं राज ठाकरे कार्यकर्त्यांना म्हणाले. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि मनसेविरोधात चुकीच्या बातम्या माध्यमांमध्ये पसरवल्या जात आहेत. राज ठाकरे कुठे जाणार आणि कुठे सभा घेणार याबद्दल त्यांनाही माहिती नसताना नको त्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत.

या चुकीच्या बातम्यांमुळे राज ठाकरे चिडले होते. त्यामुळे पक्षातच काही गद्दार लोक आहेत. गद्दारांनी माझ्या सभेतूनदेखील बाहेर जावं असं कार्यकर्त्यांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, पुढच्या दोन दिवसांमध्ये मी या गद्दार लोकांची नावं समोर आणून त्यांना पक्षातून काढून टाकेन असं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे हा गद्दारीपणा कोणी केला ? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

First published: February 15, 2020, 1:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading