मुंबई, 2 एप्रिल : हजारो मनसैनिकांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या मेळाव्याला उत्साहात सुरुवात झाली. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर होणाऱ्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. यावेळी राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. यावेळी ते म्हणाले… 2019 मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी सेना भाजपा युती विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी. निकालानंतर उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष साक्षात्कार झाला. त्याआधी ते आम्ही ऐकलं नाही, तुम्ही बोलला नाहीत. मोदी, शहांसमोर व्यासपीठावर बसले तेव्हा ते बोलले नाहीत. आपल्यामुळे सरकार अडतंय हे लक्षात आल्यावर नवी टूम काढली. अमित शाहांशी एकांतात का बोलला? मुख्यमंत्रिपद जनतेचं मग त्याची चर्चा चार भिंतीत का? एके दिवशी सकाळी उठलो तर जोडा वेगळाच. अन् डोळा कोणा दुसऱ्यालाच मारतोय’ अजित पवार-फडणवीस…आम्ही मतदान कुणाला केलं हे कळलंच नाही. मग फर्मान आलं ये शादी नही हो सकती. लग्न विस्कटलं. तीन नंबरचा पक्ष राष्टवादी १ आणि २ नंबर पक्षाला फिरवतोय, हे मी देशाच्याही राजकारणात पाहिलं नाही. हे ही वाचा- ‘शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं’, भाजपच्या जवळ असलेल्या नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे… - कोरोनामुळे अख्खं जग सामसूम होतं. - कोरोनाच्या संपूर्ण काळात महाराष्ट्रातील पोलिसांनी खाण्या-पिण्याचा, आणि स्वत:चा विचार न करता 24 तास रस्त्यावर उभं राहून काम करीत होते. - भीतीदायक असा वाटणारा कोरोनाचा काळ गेला, लॉकडाऊनमध्ये पूर्ण वेळ घरात बसणं अनेकांच्या विस्मरणात गेलं, ही चांगली बाब. - दाऊदशी संबंध असलेले नवाब मलिक हे तुरुंगात गेले. शिवाजी पार्कवर शपथविधी झाला, उद्धव ठाकरेंचा. पहिला मंत्री छगन भुजबळ जे अडीच वर्ष तुरुंगात होते. ते स्वातंत्र्यसैनिक नव्हते. ते तुमच्या नाकावर टिच्चून करतात. - नवाब मलिकांची हिंमत बघा, ते जेलमध्ये जाताना गाडीतून तुम्हाला अंगठा दाखवतायेत. आमच्या हातात राज्य द्या, आम्ही वाटेल ते करु, अशी भूमिका आहे. - उ. प्रदेशात चांगला विकास होतोय, तर ती चांगली गोष्ट आहे. नरेंद्र मोदींचं कौतुक.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.