मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'पूर्व विदर्भासह गडचिरोलीतील पूर परिस्थिती रोखण्यासाठी पालकमंत्र्यांची सूचना, म्हणाले...

'पूर्व विदर्भासह गडचिरोलीतील पूर परिस्थिती रोखण्यासाठी पालकमंत्र्यांची सूचना, म्हणाले...

राज्याचे नगरविकास मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्व विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवरून राज्याच्या सिंचन खात्याला काही सूचना केल्या आहेत.

राज्याचे नगरविकास मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्व विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवरून राज्याच्या सिंचन खात्याला काही सूचना केल्या आहेत.

राज्याचे नगरविकास मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्व विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवरून राज्याच्या सिंचन खात्याला काही सूचना केल्या आहेत.

गडचिरोली, 14 जून : जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील पूर परिस्थिती (Flood situation) संदर्भात गेल्या वर्षीच्या अनुभवावरून मध्यप्रदेशच्या संजय सरोवरासह तेलंगणातील तीन धरणांबाबत सतर्कता आवश्यक असल्याने या दोन राज्य सरकारांशी राज्याच्या सिंचन खात्यानं समन्वय साधून त्यांना तेथील धरणातून पाणी सोडण्यापूर्वी सूचना द्यायला सांगावे, असे मत राज्याचे नगरविकास मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी व्यक्त केले.

गेल्या वर्षी मध्यप्रदेशच्या संजय सरोवर धरणातून अचानक पाणी सोडण्यात आल्याने पूर्व विदर्भात पूर परिस्थिती उद्भवली होती. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पूरपरिस्थिती संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत राज्याचे नगरविकास मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्व विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवरून राज्याच्या सिंचन खात्याला काही सूचना केल्या आहेत.

गेल्या वर्षी संजय सरोवरामधून सोडण्यात आलेल्या पाण्याचा फटका पूर्व विदर्भाला बसला होता. त्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोसीखुर्द धरणाच्या पूरस्थितीबाबत एक विशेष बैठक घेण्यात आली.

एकनाथ शिंदे यांनी बैठकीत गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीची नेमकी माहिती सांगितली. मध्य प्रदेशातील संजय सरोवराचे पाणी वैनगंगा, गोसीखुर्दमध्ये वाढल्याने गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडावे लागते. परिणामी भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात  वैनगंगा आणि प्राणहिता या दोन नदी काठावरच्या गावांना फटका बसतो. गोसीखुर्द मधून पाणी सोडल्यावर ते पाणी गडचिरोलीत येण्यासाठी 12 ते 15 तास लागतात. तसेच तेलंगणाच्या मेडीगड्डाकडेम श्रीरामसागर धरणातूनही पाणी सोडले जाते. त्यामुऴे मध्यप्रदेश व तेलंगणा सरकारने पाणी सोडताना व अडवताना गडचिरोली जिल्हा प्रशासनाला कळवावे. त्यामुळे नियोजन योग्य पध्दतीने करता येईल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

हे वाचा - खासदार नारायण राणे दिल्लीला रवाना, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार?

तेलंगणा प्रशासन व आपल्या प्रशासनात समन्वय ठेवणे गरजेचे आहे. तेलंगणामधील श्रीराम सागर व कडेम या दोन धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी नदीला पूर येतो. गोदावरी नदी सिरोंचामधून जाते. पाणी वाढल्यावर प्राणहिताचा प्रवाह थांबतो व बँकवॉटर तयार होते. त्यामुळे सिरोंचा तालुका व अहेरी बॉर्डर विभागात पूरस्थिती उद्भवते. गोसीखुर्दमधून पाणी सोडताना देखील गडचिरोली जिल्हा प्रशासनाला मुख्य अभियंत्यांनी वेळेवर पूर्वसूचना द्यावी, त्यामुळे काठावरील गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे वाचा - Explainer : 9-9-6 कामाच्या संस्कृतीला तरुणाई करतेय विरोध, 12 तास कामाचं काय आहे हे प्रकरण?

याबाबत बोलताना, एकनाथ शिंदे यांच्या सूचनांची दखल घेतली जाईल. याबाबत येत्या 8 ते 10 दिवसात मध्य प्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्राचे सचिव संयुक्त बैठक घेणार आहेत. त्यामध्ये या सूचना मांडून त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग, महसूल विभागाची एकत्रित बैठक घेऊन पूरपरिस्थितीबाबत काळजी घेण्याची उपाययोजना आखण्यात येईल, असे जयंत पाटील म्हणाले.

First published:

Tags: Gadchiroli, Rain flood, Vidharbha rain