मिलिंद एकबोटेंवर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न, 40 ते 45 जणांवर गुन्हा दाखल

मिलिंद एकबोटेंवर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न, 40 ते 45 जणांवर गुन्हा दाखल

मिलिंद एकबोटेंच्या सहकाऱ्यावर चाकूने वार करण्यात आला, असाही आरोप करण्यात येत आहे.

  • Share this:

पुणे, 8 मे : कोरेगाव भीमा दंगलीतील संशयित आरोपी मिलिंद एकबोटे यांना मारहाण करण्यात आली आहे. तसंच एकबोटे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे.

मिलिंद एकबोटे हे पुरंदर तालुक्यातील एका मंदिरात किर्तनासाठी गेले होते. त्यावेळी विवेक पंडित या इसमाने आपल्या सहकाऱ्यांसह एकबोटे यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. एकबोटे यांनी गोरक्षणाबाबत फेसबुकवर लिहलेल्या पोस्टवरून हा वाद झाल्याची माहिती आहे.

मिलिंद एकबोटे आणि विवेक पंडित यांच्यातील बाचाबाचीचं रुपांतर नंतर थेट हाणामारीत झालं. यावेळी विवेक पंडित यांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप एकबोटे यांच्याकडून करण्यात येत आहे. तसंच एकबोटेंच्या सहकाऱ्यावर चाकूने वार करण्यात आल्याचाही आरोप आहे.

मिलिंद एकबोटे आणि कोरेगाव भीमा

कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर शिक्रापूर पोलीस ठाण्यात मिलिंद एकबोटे यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये पहिला गुन्हा हा अॅट्रोसिटी आणि दंगल भडकवल्याप्रकरणी होता तर दुसरा गुन्हा हा बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना झालेल्या दुखपतीबद्दल होता. यापैकी अॅट्रोसिटी आणि दंगल भडकवण्याच्या गुन्ह्यात एकबोटे यांना 4 एप्रिल रोजी जामीन मंजूर झाला .

शिक्रापूर न्यायालयाने नंतर त्यांना या प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर केलेल्या जामीन अर्जाचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांना 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

VIDEO: राणेंच्या उद्धव ठाकरेंवरील गंभीर आरोपात किती तथ्य? मनोहर जोशी म्हणतात...

First published: May 8, 2019, 1:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading